SEE PICS : ‘हेट स्टोरी-४’मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हॉट इहाना ढिल्लों!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 21:10 IST
‘डॅडी कूल मुंडे फूल’ आणि ‘टायगर’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री इहाना ढिल्लों आता बॉलिवूडमध्ये धूम उडविण्यास सज्ज ...
SEE PICS : ‘हेट स्टोरी-४’मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हॉट इहाना ढिल्लों!
‘डॅडी कूल मुंडे फूल’ आणि ‘टायगर’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री इहाना ढिल्लों आता बॉलिवूडमध्ये धूम उडविण्यास सज्ज आहे. होय, सुंदर इहाना लवकरच ‘हेट स्टोरी-४’मध्ये बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. इहानाने स्वत:च या बातमीस दुजोरा दिला असून, तिने म्हटले की, ‘मी ‘हेट स्टोरी-४’मध्ये काम करणार आहे. मला सर्वांत अगोदर प्रॉडक्शन हाउसमधून फोन आला होता. सुरुवातीला मला याविषयी काहीसा संशय होता. त्यामुळे मी यास नकार दिला. नकाराचे कारण देताना मी म्हटले की, मला बोल्ड भूमिकेबरोबर माझ्या बॉलिवूड कारकिर्दीस सुरुवात करायची नाही. मात्र दुसºयांदा जेव्हा माझी टीमबरोबर भेट झाली तेव्हा त्यांनी चित्रपटाची पूर्ण कथाच मला ऐकविली अन् मी होकार दिला.’ पुढे बोलताना इहानाने म्हटले की, ‘चित्रपटाची पूर्ण कथा ऐकल्यानंतर आणि माझी भूमिका समजून घेतल्यानंतरच मी होकार दिला आहे.’ दरम्यान, या चित्रपटाची शूटिंग येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू केली जाण्याची शक्यता आहे. यावेळी इहानाने हेदेखील सांगितले की, ‘चित्रपटात तिच्या लूकपेक्षा अभिनयाला अधिक महत्त्व दिले आहे. मी या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असून, माझा बॉलिवूड डेब्यू दमदार होईल यात शंका नाही.’ असेही इहानाने स्पष्ट केले. ‘हेट स्टोरी’ फ्रेन्चाइजीविषयी सांगायचे झाल्यास आतापर्यंत चित्रपटाचा प्रत्येक भाग अतिशय वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला आहे. मात्र त्याचबरोबर चित्रपटात बोल्डनेसचाही तेवढाच तडका लावण्यात आला आहे. अशात इहानाने जरी बोल्डनेस करणार नसल्याचे सांगितले असले तरी, वास्तवात चित्रपटात प्रेक्षकांना वेगळेच चित्र बघावयास मिळाले तर नवल वाटू नये. कारण इहाना खूप सुंदर असून, पंजाबी इंडस्ट्रीमध्ये तिचे सौंदर्य हाच प्लस पॉइंट राहिला आहे. तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यावरच भावून जाणाºया चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. अशात ‘हेट स्टोरी’सारख्या सिरिजमध्ये तिचा अभिनय बोल्ड नसेल यावर विश्वास ठेवणे प्रेक्षकांना थोडे जडच होईल.