Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS: तैमूरच्या अम्मी- अब्बूने अशी एन्जॉय केली पहिली रोमॅन्टिक डिनर डेट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 14:53 IST

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिने अलीकडे एका गोंडस मुलाला जन्म दिला. आई बनल्यानंतर करिना काही दिवस तरी आराम ...

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिने अलीकडे एका गोंडस मुलाला जन्म दिला. आई बनल्यानंतर करिना काही दिवस तरी आराम करेल, असा अंदाज असताना काल बुधवारी बेबोने आपल्या लाडक्या हबीसोबत रोमॅन्टिक डिनर डेट एन्जॉय केली. रोमॅन्टिक यासाठी की, लाडका तैमूर त्यांच्यासोबत नव्हता.नारंगी रंगाची मॅक्सी ड्रेस परिधान केलेली करिना हबी सैफ अली खान याच्या हातात हात घालून घराबाहेर पडली. यावेळी सैफने बंद गळ्याचा कुर्ता-पायजामा घातलेला होता. या क्यूट कपलचे फोटो घ्यायला मग फोटोग्राफर सरसावले नसतील तर नवल.यावेळी करिना अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या चेहºयावरचे तेजही स्पष्टपणे दिसत होते.फोटोग्राफर्स करिना आणि सैफचे फोटो क्लिक करण्यासाठी सरसावले. यावेळी करिना कुठलीही तक्रार न करताना अगदी आनंदाने फोटोग्राफर्सच्या कॅमे-यांना सामोरी गेली.सैफ करिनाची अगदी मनापासून काळजी घेताना यावेळी दिसला. पूर्णवेळ तो करिनाचा हात हातात घेऊन होता.आई बनल्यानंतर करिना दुस-यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसली. सर्वात आधी प्रसूतीनंतर हॉस्पीटलबाहेर ती मीडियाला सामोरे गेली होती. यावेळी तिने आणि सैफने तैमूरसह मीडियाला पोझ दिली होती.तैमूरच्या जन्मानंतर करिना आणि सैफ दोघेही जाम आनंदात आहे. तैमूरच्या जन्मानंतर लगेच करिना व सैफ यांनी आपल्या घरी नाताळची पार्टी दिली होती. या पार्टीला पतौडी आणि खान कुटुंबीयांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या डिनर डेटनंतर करिना आपल्या कामावर परतण्यासाठी अगदी तयार आहे, असेच म्हणावे लागेल. प्रसूतीनंतर महिनाभरात आपण कामावर परतणार असल्याचे आधीच करिनाने स्पष्ट केले आहे. आता करिना कधी परतते, ते बघूयात!!