SEE PICS : ‘भिकारी’ चित्रपटाच्या प्रिमीयरला तारे-तारकांची वर्णी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST
स्वप्नील जोशी आणि ऋचा इनामदार यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘भिकारी’ चा प्रिमीयर सोहळा अलीकडेच मुंबईत संपन्न झाला. या सोहळ्याला स्वप्नील जोशी यांच्या कुटुंबियांसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती.
SEE PICS : ‘भिकारी’ चित्रपटाच्या प्रिमीयरला तारे-तारकांची वर्णी....
स्वप्नील जोशी आणि ऋचा इनामदार यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘भिकारी’ चा प्रिमीयर सोहळा अलीकडेच मुंबईत संपन्न झाला. या सोहळ्याला स्वप्नील जोशी यांच्या कुटुंबियांसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती.अभिनेता स्वप्नील जोशी त्याचे कुटुंबीय, आई-वडील, पत्नी, मुलगी मायरा यांच्यासह स्टेजवर आला होता. दिपाली सय्यद ही अशा क्यूट आऊटफिटमध्ये या सोहळ्याला आली होती. तिचा हा अंदाज पाहण्यासारखा होता. गणेश आचार्य हा देखील या प्रिमीयरला उपस्थित झाला होता. त्याने त्याच्यासोबत त्याच्या आईला देखील सोहळयासाठी आमंत्रित केले होते. सई ताम्हणकर हिने अशा लाँग स्कर्टमध्ये येथे उपस्थिती नोंदवली होती. मानसी नाईक आणि स्वप्नील जोशी हे जुने मित्र असून दोघांनी फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली. मानसी नाईक लाल रंगाच्या साडीमध्ये अशी एकदम क्यूट दिसत होती. स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर म्हणजे मराठी रसिकांची हिट जोडी. त्यांनी फोटोग्राफर्सना अशी रोमँटिक पोझ दिली. सिद्धार्थ चांदेकर हा मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय. तो देखील या सोहळयासाठी आला असता त्याने फोटोग्राफर्सना अशी मस्त पोझ दिली. सचिन पिळगांवकर हे देखील यांनीही प्रिमीयरला आवर्जून उपस्थिती लावली होती. अशा सोहळयाप्रसंगी सई आणि स्वप्नील यांच्याकडे कॅमेऱ्यांचे लक्ष हे असतेच. सईने स्वप्नीलच्या गालावर किस करतानाचा फोटो कॅमेऱ्यात कैद केला. सध्या चर्चेत असलेली गौरी अर्थात सायली संजीव हिने देखील या सोहळयाला हजेरी लावली होती. स्वप्नील, सई आणि गणेश आचार्य यांनी फोटोग्राफर्सना अशी एकत्र पोझ दिली. सोनाली कुलकर्णी हिने घातलेला ब्लॅक रंगाचा ड्रेस तिला खूपच खुलून दिसत होता. पाहा तिचा हा क्यूट अंदाज...