Join us

see pics : ​वडिलांना अखेरचा निरोप देताना ऐश्वर्या रायला अश्रू अनावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 11:09 IST

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय (७२) यांनी काल शनिवारी सायंकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. काही आठवड्यांपासून त्यांची ...

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय (७२) यांनी काल शनिवारी सायंकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. काही आठवड्यांपासून त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते; मात्र दिवसाआड त्यांची तब्येत खालावत गेल्याने आज त्यांचे निधन झाले. कृष्णराज यांच्या अंत्यविधीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. अमिताभ बच्चन, संजय लीला भन्साळी, शाहरूख खान, रणधीर कपूर आदी कृष्णराज यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेत.ऐश्वर्यासुद्धा यावेळी दिसली. तिच्या डोळ्यांत अश्रूंची गर्दी होती. गाडीत अभिषेक तिच्या बाजूला बसलेला होता. गेल्या अनेक आठवड्यांपासून ऐश्वर्या रूग्णालयात वडिलांची सेवा करत होती.कृष्णराज कर्करोगाने पीडित होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. पण अलीकडे त्यांचा कर्करोग पलटून आल्या. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून लीलावती रूग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते. मीडियातील बातम्या मानाल तर, कृष्णराज यांना लिंफोमा कॅन्सरने ग्रासले होते. हा कॅन्सर त्यांच्या ब्रेनपर्यंत पोहोचला होता.कृष्णराज राय यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेता अमिताभ बच्चनही रुग्णालयात पोहोचले होते. वडिलांना आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत रुग्णालयात गेली होती. अमेरिका दौ-याहून परतलेला अभिषेक तात्काळ ऐश्वयासोबत रुग्णालयात पोहोचला होता. यावेळी ऐश्वर्याच्या चेह-यावर चिंता स्पष्ट  दिसली होती.  अभिनेत्री ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय हे रुग्णालयात दाखल असल्याने बच्चन कुटुंबाने यावर्षी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता.  अलीकडे ऐश्वर्या आराध्याच्या स्पोर्ट डेवर तिच्यासोबत दिसली होती. आराध्याला चिअर अप करण्यासाठी ती पोहोचली होती. आराध्याला वेळ देत असतानाच ती आपल्या वडिलांचीही काळजी घेत होती.