SEE PICS : अबब... शाहरूख खानने चक्क सोन्याच्या ताट्यात घेतला महाराजा थाळीचा आस्वाद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 20:06 IST
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त शाहरूख सध्या जोधपूर ...
SEE PICS : अबब... शाहरूख खानने चक्क सोन्याच्या ताट्यात घेतला महाराजा थाळीचा आस्वाद!
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त शाहरूख सध्या जोधपूर आणि जयपूरच्या दौºयावर असून, त्याच्या दौºयातील काही फोटोंनी सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. कधी स्थानिक पोशाखात तर कधी राजस्थानी अंदाजात तो लोकांना आपलेसे करीत आहे. परंतु आता समोर आलेल्या फोटोंमध्ये शाहरूखचा अंदाज बघण्यासारखा असून, त्यात तो चक्क सोन्याच्या ताटात राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेताना बघावयास मिळत आहे. शाहरूखच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे आतापर्यंत चार गाणी आणि बरेचसे मिनी ट्रेलर रिलीज झाले आहेत. हे सर्व गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याने सगळ्यांना त्याच्या या चित्रपटाची आतुरता लागली आहे. दरम्यान, शाहरूखच्या राजस्थानी दौºयातील काही फोटोज् सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. एका फोटोमध्ये तो राजस्थानी पगडीमध्ये, तर दुसºया फोटोत चक्क सोन्याच्या ताटात जेवण करताना दिसत आहे. शाहरूखने पहिल्यांदाच राजस्थानी फूड रेस्टॉरंटमध्ये सोन्याच्या ताटात दाल-बाटी आणि चुरमाची चव चाखली आहे. खरं तर राजस्थानी जेवणाबद्दल लोक नेहमीच असे म्हणतात की, जो कोणी राजस्थानी जेवणाची चव चाखतो तो या जेवणाचा चाहता बनतो. शाहरूखला बघून याची जाणीवही होते. कारण ताटभर असलेल्या जेवणाला शाहरूख ज्या पद्धतीने एक टक बघून न्याहाळत आहे, त्यावरून तो राजस्थानी जेवणाच्या प्रेमात पडला असेल यात शंका नाही. शाहरूखला तब्बल १४ वाट्यांमध्ये राजस्थानी खाद्यपदार्थ वाढले होते. शाहरूखनेही मोठ्या चवीने दोन वाट्यांमधील पदार्थांची चव चाखली. याव्यतिरिक्त त्याने जोधपुरी गट्टेची भाजी, कॅर सांगरी, बेसनचा चुरमा, प्लेन चुरमा कढी, घेवर, मालपुुवा, केसरची खीर आणि राजस्थानी पापडाचीही चव चाखली. जेवणाअगोदर शाहरूखला पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. यावर त्याने काही फोटोही शूट केले. यावेळी त्याच्या हातात तलवारही देण्यात आली. अगदी महाराजा अंदाजात त्याचे स्वागत करण्यात आले. पाहुणचार म्हणून त्याला महाराजा थाळी वाढण्यात आली होती. या थाळीची जर तुम्ही किंमत ऐकाल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, सोन्याच्या या थाळीची किंमत दहा हजार रुपये इतकी आहे. शाहरूखने या दौºयादरम्यान त्याच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे प्रमोशनही केले. चित्रपटात तो एक इंटरनॅशनल टूरिस्ट गाइडची भूमिका साकारत आहे. परंतु जोधपूर पोहचल्यानंतर त्याला खराखुरा गाइड बनविले. होय, तेथील टूरिस्ट गाइड असोसिएशनने त्याला आॅनररी सदस्य बनविले. त्यामुळे आता शाहरूख खराखुरा गाइड झाला आहे.