असे म्हटले जात आहे की, रिया लग्नाअगोदरच प्रेग्नंट होती, त्यामुळे तिने कुठलाही गाजावाजा न करता मोजक्याच मित्रपरिवारांसमवेत बॉयफ्रेंड शिवम तिवारीबरोबर लग्न उरकले. वास्तविक या बातमीला कुठलाही आधार नसल्याने ही निव्वळ चर्चा आहे. असो, रियाने तिच्या लग्नाचा पहिला फोटो शेअर केला असून, त्यामध्ये नवदाम्पत्य खूपच आनंदी दिसत आहे. रिया आणि शिवम लग्नमंडपात बसलेली असून, त्यांच्या परिवारातील वरिष्ठ व्यक्ती सातजन्माची गाठ बांधताना फोटोमध्ये दिसत आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रियाच्या लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते. त्यामध्ये दोघांचेही क्लोज फ्रेंड्स आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते. या लग्नाबाबत खूपच गुप्तता पाळण्यात आली. जेव्हा लग्न पार पडले तेव्हा याविषयीची माहिती सर्वांना देण्यात आली. रिया बॉयफ्रेंड शिवम तिवारी याला गेल्या काही काळापासून डेट करीत आहे. ते नेहमीच एकमेकांसोबत वेळ घालविताना बघावयास मिळत असत.
रियाचे बॉलिवूड करिअर खूपच वादग्रस्त राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, ‘रागिणी एमएमस २.५’च्या शूटिंगदरम्यान तिने अचानकच तिच्या सह-अभिनेत्याची पॅण्ट खेचली होती. रियाच्या या कृतीमुळे संपूर्ण युनिट दंग राहिले होते. अखेर रियाने असे का केले? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यानंतर उलगडा झाला होता की, मेकर्स त्याला बोल्ड करण्यासाठी फोर्स करीत होते, परंतु तो त्यास फारसा तयार दिसत नसल्याने रियाने हा प्रकार केला होता.