Join us

​SEE PIC : सततच्या अपयशाला कंटाळून रणबीर कपूरने मानला ज्योतिषाचा सल्ला! वाचा सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 15:13 IST

स्टार किड्स म्हणून सहज संधी मिळण वेगळं आणि या संधी पलीकडे बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणे वेगळं. ...

स्टार किड्स म्हणून सहज संधी मिळण वेगळं आणि या संधी पलीकडे बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणे वेगळं. कदाचित अभिनेता रणबीर कपूर सध्या याच अनुभूतीतून जातोय. खरे तर अभिनयात रणबीर कपूर कुठेच कमी नाही. त्याचे असंख्य चाहते आहेत. तरूणी तर अक्षरश: त्याच्यावर फिदा आहेत. पण तरिही अपयश रणबीरचा पिच्छा सोडायला तयार नाहीय. संजय लीला भन्साळींसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या बिग बजेट ‘सावरियां’ या चित्रपटातून रणबीरचे ग्रॅण्ड लॉन्चिंग झाले. रणबीरने पडद्यावर आपल्या अभिनयाची चुणूकही दाखवली. पण  बॉक्सआॅफिसवर रणबीरच्या या पहिल्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. पुढेही ‘बर्फी’ अन् ‘ये जवानी है दिवानी’ असे चार दोन सिनेमे सोडले तर रणबीरच्या वाट्याला यश कमी अन् अपयशच अधिक आले. गत वर्ष आणि यंदाचे वर्ष तर रणबीरसाठी चांगलेच वाईट लागले. अलीकडे त्याचे आलेले सगळे सिनेमे दणकून आपटले.   तगडी स्टारकास्ट, मोठे दिग्दर्शक, नामांकित निर्मिती संस्था, आक्रमक प्रसिद्धी असे सगळे असूनही रणबीर अपयशी ठरला. आता कदाचित या सततच्या अपयशाने रणबीरचा धीरही तुटू लागलाय. आता धीर तुटू लागला म्हटल्यावर मिळेल त्या मार्गाची भिस्त वाटायला लागते. रणबीरबाबतही सध्या तेच होतय. पाठीमागच्या अपयशाचा ससेमिरा चुकावा यासाठी रणबीर सध्या ज्योतिषांच्या शरण गेल्याचे दिसतेय.   सूत्रांचे मानाल तर, ज्योतिषांनी रणबीरला काही रत्नांच्या अंगठ्या बोटात धारण करण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत रणबीरच्या बोटांत या अंगठ्या दिसू लागल्या आहेत. अलीकडचा त्याचा हा ताजा फोटो याचा पुरावा आहे.ALSO READ : ​रणबीर कपूरच्या ‘फ्लॉप’ सिनेमांमुळे संतापले ऋषी कपूर ! ‘या’ दोन दिग्दर्शकांची केली माकडांशी तुलना!!मुंबई विमानतळावर त्याच्या बोटात दोन अंगठ्या पाहायला मिळाल्या. या अंगठीच्या मदतीने रणबीरच्या करिअरची घसरलेली गाडी रूळावर येईल, असे म्हटले जातेय.  आता यात किती सत्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण रणबीरच्या करिअरची गाडी कुठल्या का माध्यमाने होईना रूळावर यावी, हे मात्र आम्हाला प्रामाणिकपणे वाटतेय.