Join us

See Pic : आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’च्या सेटचे फोटो झाले लिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 22:48 IST

महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यांचा बहुचर्चित चित्रपट ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ची शूटिंग सुरू झाली असून, चित्रपटाविषयीच्या ...

महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यांचा बहुचर्चित चित्रपट ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ची शूटिंग सुरू झाली असून, चित्रपटाविषयीच्या घडामोडींबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यशराज बॅनरअंतर्गत निर्मिती केली जात असलेल्या या चित्रपटात अमिताभ आणि आमिर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत. सध्या या चित्रपटाची विदेशात शूटिंग सुरू असून, सेटवरील काही फोटोज लिक झाल्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा चित्रपटाविषयी चर्चा रंगली आहे. खरं तर सुरुवातीपासूनच हा चित्रपट ‘पायरेट्स आॅफ केरिबियन’ या चित्रपटाशी मिळता-जुळता असल्याची चर्चा रंगली होती. परंतु आमिर खान याने ही चर्चा चुकीची असल्याचे म्हटले होते. मात्र लिक झालेल्या सेटच्या फोटोवरून हा चित्रपट ‘पायरेट्स आॅफ केरिबियन’ या चित्रपटापासूनच प्रेरित असावा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण चित्रपटाचा सेट ‘पायरेट्स आॅफ केरिबियन’शी मिळता-जुळता आहे. चित्रपटात काही ठग लोकांना लुटताना दाखविण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅटरिना कैफ हिचे नाव या चित्रपटात फायनल झाले होते. आता आलेल्या माहितीनुसार चित्रपटात कॅटरिना आमिरची हिरोइन असणार आहे. कॅटरिनाबरोबरच दंगल फेम सना फातिमा शेख हीदेखील चित्रपटात बघावयास मिळणार आहे. तर चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन आमिरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची कथा स्वातंत्र्य मिळण्याअगोदर ब्रिटिश राजवटीतील ठगांवर आधारित आहे. हा चित्रपट मेडोव्स टेलर यांचे ‘कन्फेशन आॅफ अ ठग’ या पुस्तकावर आधारित असून, २०१८ मध्ये दिवाळीत रिलीज होणार आहे. ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ असा चित्रपट आहे, ज्यामध्ये दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य, अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कॅटरिना दुसºयांदा एकत्र काम करीत आहेत. या अगोदर तिघांनीही ‘धूम-३’मध्ये काम केले आहे. या चित्रपटाची शूटिंग पुढच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून, सर्व कलाकार सध्या विदेशात पोहोचले आहेत. सूत्रानुसार या चित्रपटासाठी आमिरने निर्मात्यांकडे एका मोठ्या रकमेची डिमांड केली आहे. तसेच आदित्यकडे चित्रपटाच्या प्रॉफिटमधील हिस्साही मागितला आहे. त्याने ७० टक्के प्रॉफिटची डिमांड केली आहे. म्हणजेच ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाला जर एक हजार कोटी रुपयांचा फायदा झाल्यास त्यातील तीनशे कोटी रुपये आमिरला मिळणार आहेत.