SEE PIC : कॅटरिना कैफने शेअर केला बहिणीचा फोटो; युजर्सने म्हटले ‘सोनी कुडी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 19:02 IST
कॅटरिना कैफने बहिणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांना एवढा भावत आहे की, काहींनी त्यास ‘सोनी कुडी’ असे म्हटले आहे.
SEE PIC : कॅटरिना कैफने शेअर केला बहिणीचा फोटो; युजर्सने म्हटले ‘सोनी कुडी’!
अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. दिवसाआड ती कुठला ना कुठला फोटो शेअर करीत असते. यावेळेस तिने बहिणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांना एवढा भावत आहे की, काहींनी त्यास ‘सोनी कुडी’ असे म्हटले आहे. हा फोटो कॅटची बहीण इजाबेलचा आहे. कॅटने २० आॅगस्ट रोजी हा फोटो शेअर करताना ‘सनसाइन सिस्टर’ असे त्यास कॅप्शन लिहिले आहे. हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांकडून त्यास तुफान लाइक्स आणि कॉमेण्ट्स मिळत आहेत. काही युजर्सनी कॉमेण्ट देताना लिहिले की, ‘तुझी बहीण खूपच सुंदर आणि प्रेमळ दिसत आहे.’ तर काहींनी इजाबेलची तुलना कॅटसाबेत करताना लिहिले की, ‘तुझी बहीण तुझ्यापेक्षाही अधिक सुंदर आहे.’ एका युजर्सने लिहिले की, ‘कुडी सोनी और प्यारी है’ अशा पद्धतीने या फोटोला चाहत्यांकडून तुफान पसंती मिळत आहे. आतापर्यंत दोन लाख ९० हजार युजर्सनी या फोटोला लाइक केले आहे. कॅटरिनाला पाच बहिणी असून, मायकल नावाचा एक भाऊ आहे. इजाबेल कॅटची सर्वात लहान बहीण असून, फॅशन वर्ल्डमध्ये ती प्रचंड प्रसिद्ध आहे. मॉडेलिंगबरोबरच ती एक अभिनेत्रीदेखील आहे. इजाबेल तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हॉट फोटो शेअर करीत असते. इन्स्टावर इजाबेलचे १ लाख ७२ हजार लोक फॉलोअर्स आहेत. इजाबेल तिच्या सेक्स एमएमएसमुळे चर्चेत आली होती. व्हिडीओमध्ये दिसत असलेली तरुणी इजाबेलच होती, असा दावा करण्यात आला होता. मात्र याप्रकरणी कॅट आणि तिच्या आईने त्यांची बाजू मांडली होती. त्यांनी म्हटले होते की, व्हिडीओमध्ये दिसत असलेली तरुणी सजाबेल नसून, तिच्यासारखी दिसणारी दुसरीच कोणीतरी आहे. असो इजाबेल बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार या चर्चेमुळे मध्यंतरी लाइमलाइटमध्ये आली होती. कॅटप्रमाणेच इजाबेललाही बॉलिवूडमध्ये एंट्री करायची असल्याचे तिने बºयाचदा म्हटले होते. मधल्याकाळात तर अशीही बातमी समोर आली होती की, इजाबेलला बॉलिवूडचा दबंग सलमान खान लॉन्च करणार आहे. त्याचदरम्यान, इजाबेल कॅटसोबत बॉलिवूडच्या एक इव्हेंटमध्ये बघावयास मिळाली होती.