SEE PIC : ब्लॅक ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसली नेहा शर्मा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 22:36 IST
इंडस्ट्रीमधून गायब झाल्यानंतर पुन्हा चर्चेत येण्यासाठी सेलेब्स काय करतील याचा भरवसाच नाही. आता हेच बघा ना, बॉलिवूडच्या सर्वात सुंदर ...
SEE PIC : ब्लॅक ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसली नेहा शर्मा!
इंडस्ट्रीमधून गायब झाल्यानंतर पुन्हा चर्चेत येण्यासाठी सेलेब्स काय करतील याचा भरवसाच नाही. आता हेच बघा ना, बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली नेहा शर्मा मुंबईच्या विमानतळावर अशा काही अवतारात स्पॉट झाली की, कॅमेºयाच्या सर्व नजरा तिच्यावर खिळल्या. शिवाय नेहाचा हा अवतारही सर्वत्र व्हायरल झाल्याने ती चर्चेत आली आहे. मुंबई विमानतळावर स्पॉट झालेली नेहा ब्लॅक ट्रान्सपरंट टॉप आणि जिन्समध्ये बघावयास मिळाली. तिचा हा लूक अतिशय हॉट दिसत असल्याने नेहा लगेचच चर्चेत आली. कॅमेºयाला सामोरे जाताना तिने पोजही दिल्या. शिवाय ती खूपच रिलॅक्स मूडमध्ये दिसत होती. २९ वर्षीय नेहा ‘तुम बिन २’मध्ये बघावयास मिळाली होती. तसेच तिने ‘क्या सुपर कुल है हम’, ‘यंगिस्तान’, ‘यमला पगला दिवाना’ आदि चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविली. नेहा २००७ पासून इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे. परंतु मधल्या काळापासून ती जणू काही इंडस्ट्रीमधून गायबच झाली आहे. ‘एफएचएम’ या साप्ताहिकाने नेहाचे जगातील सर्वाधिक सेक्सी महिलांच्या यादीत सातवे स्थान दिले होते. त्यावेळी तिच्या सौंदर्याची सर्वदूर चर्चा रंगली होती. नेहा बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती एका राजकीय कुटुंबाशी संबंधित आहे.