Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PIC : मम्मी, पप्पासह मीशा झाली स्पॉट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 20:04 IST

नेहमीच आपल्या मुलीला माध्यमांपासून लपविणारे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे दाम्पत्य यावेळेस मात्र वेगळ्याच अंदाजात बघावयास मिळाले. गेल्या ...

नेहमीच आपल्या मुलीला माध्यमांपासून लपविणारे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे दाम्पत्य यावेळेस मात्र वेगळ्याच अंदाजात बघावयास मिळाले. गेल्या सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर जेव्हा हे दाम्पत्य स्पॉट झाले तेव्हा ते मुलगी मीशा हिला माध्यमांपासून न लपविता घेऊन गेले. त्यामुळे आपल्या मम्मी-पापासोबतचे मीशाचे काही क्यूट फोटोज् कॅमेºयात टिपता आले.  आईच्या कडेवर असलेल्या मीशाला पिंक ड्रेस घातलेला होता. मीरा व्हाइट टॉप आणि डेनिम्समध्ये होती. तर ‘पद्मावती’ची शूटिंग करीत असलेला शाहिद व्हाइट टी-शर्ट आणि ब्राऊन पॅण्टमध्ये बघावयास मिळाला. मीशाच्या जन्मानंतर तब्बल सहा महिन्याने तिचा पहिला फोटो शाहिदने शेअर केला होता. मीशाचा जन्म २६ आॅगस्ट २०१६ रोजी झाला. पापा शाहिदची लाडकी असलेल्या मीशाला शाहिद अन् मीराने नेहमीच कॅमेºयापासून दूर ठेवले आहे. त्यामुळेच जेव्हा केव्हा शाहिद आणि मीरा मीशासह बाहेर किंवा एअरपोर्टवर स्पॉट होत असे, तेव्हा तो तिला कपड्याने झाकून माध्यमांपासून दूर जात असे;  मात्र पहिल्यांदाच असे घडले की, शाहिद आणि मीराने मीशाला माध्यमांपासून न लपविता बिंधास्तपणे आपली वाट धरली. त्यामुळे छायाचित्रकारांना मीशाचे काही फोटोज् क्लिक करायला मिळाले; मात्र ती मम्मी मीराच्या कडेवर असल्याने तिचा चेहरा स्पष्टपणे कॅमेºयात कैद झाला नाही. परंतु शाहिद आणि मीराचा हा बिंधास्तपणे त्यांच्या फॅन्सला नक्कीच आवडेल यात शंका नाही.