SEE PIC : मलाइका अरोराचा पहा स्पोर्टी लुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 15:52 IST
अभिनेत्री मलाइका अरोरा तिच्या फिटनेसबाबत किती अलर्ट असेल हे तिच्याकडे बघून लगेचच लक्षात येते. कारण आजही मलाइकाचा फिगर मेंटेण्ड ...
SEE PIC : मलाइका अरोराचा पहा स्पोर्टी लुक!
अभिनेत्री मलाइका अरोरा तिच्या फिटनेसबाबत किती अलर्ट असेल हे तिच्याकडे बघून लगेचच लक्षात येते. कारण आजही मलाइकाचा फिगर मेंटेण्ड असून, त्यासाठी ती नियमितपणे जीम आणि योगा करीत असते. नुकतीच योगा क्लासच्या बाहेर पडलेल्या मलाइकाला कॅमेºयात कैद केले असता, तिचा जलवा समोर आला आहे. स्पोर्टी लुकमध्ये असलेली मलाइका खूपच सुंदर दिसत असून, तिच्या फिगर मेंटेण्डचे रहस्यही यानिमित्त समोर आले आहे. ४३ वर्षीय मलाइकला बॉलिवूडमध्ये आयटम नंबरसाठी ओळखले जाते. आतापर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर करून धूम उडवून दिली आहे. डान्सिंग आणि आपल्या हॉटनेसचा तडका लावत आजही मलाइका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. मात्र यासाठी ती प्रचंड मेहनत घेत असून, आपल्या फिगरप्रती खूपच कॉन्सिस असते. दरम्यान, योगासाठी तिला बहीण अमृता अरोरा हिचीही साथ मिळत असून, दोघी बहिणी नियमितपणे योगा क्लासला जात असतात. वास्तविक आतापर्यंत आपण या दोघी बहिणींना रेस्टॉरंट किंवा शॉपिंग करताना मार्केटमध्ये बघितले आहे. परंतु या दोघी बहिणी योगासाठीदेखील एकत्रच जात असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे. मलाइकाविषयी बोलायचे झाल्यास अरबाज खानसोबत सध्या तिचा दुरावा निर्माण झाला आहे. मध्यंतरी हे दोघे घटस्फोट घेणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र मधल्या काळात हे दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने त्यांच्यात पुन्हा जवळीकता तर निर्माण झाली ना? असेच काहीसे चित्र दिसत आहे. अरबाजची बहीण अर्पिताच्या मुलाच्या वाढदिवसासाठी मलाइका आणि अरबाज मालदीव येथे गेले होते.