SEE PIC : रिमा लागू यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची उपस्थिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 17:19 IST
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू (वय५९) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. चित्रपट, मालिका अन् मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक ...
SEE PIC : रिमा लागू यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची उपस्थिती!
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू (वय५९) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. चित्रपट, मालिका अन् मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक दमदार भूमिका साकारणाºया रिमा यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, रिमा यांचे पार्थिव त्यांच्या मुंबई स्थित घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले असून, याठिकाणी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अभिनेते ऋषी कपूर, आमिर खान व त्याची पत्नी किरण राव, काजोल, रजा मुराद, सान्या मल्होत्रा, शमा देशपांडे, टीव्ही अभिनेत्री बरका बिष्ठ, सचिन पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, ‘नामकरण’ या मालिकेचा अभिनेता विराफ पटेल, रिना दत्त आदि उपस्थित होते. रिमा लागू यांनी अनेक बॉलिवूडपटांमध्ये ‘मॉँ’ची भूमिका साकारल्या होत्या. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांना या भूमिकेसाठीच विशेष ओळख मिळाली. सलमान खान, शाहरूख खान यांच्यासह माधुरी दीक्षितच्याही आईची भूमिका त्यांनी साकारली होती. काही चित्रपटांमध्ये त्यांनी ‘मॉँ’ची भूमिका अजरामर केली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली असून, अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, रिमा यांना तब्बल चारवेळा फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.