Join us

SEE PIC : आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये दमदार लुक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 17:24 IST

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटात असा काही बिझी असतो की, तो फारच कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी बघावयास ...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटात असा काही बिझी असतो की, तो फारच कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी बघावयास मिळतो. त्यामुळे तो त्याच्या आगामी चित्रपटात कसा दिसत असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता असते. सध्या आमिर त्याच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, या चित्रपटातील त्याच्या लूकविषयी अनेकांना उत्सुकता आहे. याच लूकमधील काही फोटोज् क्लिक करण्यात आल्याने ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील त्याच्या लूकचा एकप्रकारे उलगडाच झाला आहे. काल रात्री आमिर खान मुंबई येथील एका स्पामध्ये पोहोचला होता. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका कॅमेरामॅनने त्याचे काही फोटोज् क्लिक केले आहेत. फोटोंमध्ये आमिर अतिशय कुल लूकमध्ये दिसत आहे. नेव्ही ब्लू रंगचा टी-शर्ट परिधान केलेल्या आमिरच्या हातात त्याचा फेव्हरेट आयफोन आणि चेहºयावर गोड स्माईल दिसत आहे. आमिर खान नेहमीच म्हणत आला की, तो स्वत:शीच स्पर्धा करीत असतो. त्यात तथ्यदेखील आहे, कारण तो स्वत:च्याच एका पाठोपाठ एक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करीत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर अनेक रेकॉर्ड केले आहेत. आता हेच रेकॉर्ड ब्रेक करण्याचे त्याच्यासमोर आव्हान आहे. कदाचित ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधून तो ते ब्रेकही करेल. दरम्यान, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात आमिर खानबरोबर अमिताभ बच्चन पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करीत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करीत आहेत. सुरुवातीला असे बोलले जात होते की, चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असेल. परंतु आता अनुष्काच्या नावावर पूर्णविराम देण्यात आला आहे. कारण आमिरने त्याच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण नियम तयार केला आहे. त्या नियमानुसार आमिर एकदा ज्या अभिनेत्रीबरोबर काम करतो, तिच्याबरोबर पुन्हा काम करण्यास त्याचा सपशेल नकार असतो.