Join us

SEE PHOTOS : आमीर खानला आवडली गुजराती थाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 10:41 IST

अभिनेता आमिर खान आपला आगामी चित्रपट सीक्रेट सुपरस्टारच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या तो गुजरातमध्ये आहे. गुजरातच्या ...

अभिनेता आमिर खान आपला आगामी चित्रपट सीक्रेट सुपरस्टारच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या तो गुजरातमध्ये आहे. गुजरातच्या बडोदरा शहरात तो सीक्रेट सुपरस्टारचे प्रमोशन करतो आहे. सध्या गुजरातमध्ये गरब्या सेलिब्रेशनचा मूड आहे. यासाठी आमीर खान आपल्या चित्रपटाचे प्रमोशन गुजरातमध्ये करतो आहे. सध्या आमीर खान आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष देतो आहे. मात्र अजूनपर्यंत त्यांनी गुजरात जेवण कधी चाखले नव्हते. एक दिवस आपल्या टायटिंगला बाजूला ठेवत आमीर खानने आपल्या चित्रपटाच्या टीमसोबत गुजरात खाळीची आस्वाद घेतला.खास गुजराती जेवण्याची चव चाखण्यासाठी आमिर खान बडोदऱ्यामधल्या स्तिथ मंडप हॉटेलमध्ये गेला होता. याठिकाणी पारंपारिक पद्धतीने आमीर जेवण वाढण्यात आले. आमीरने एक एका डिशची चव मोठ्या आनंदाने घेतली. यानंतर गुजराती जेवण्याचा आमीर फॅन बनला.ऐवढेच नाही तर आमीरने हॉटेलमधल्या आचाऱ्याला आपल्या जवळ बोलवून त्याच्यासोबत फोटो देखील काढला. आपण आतापर्यंत सर्वोत्तम जेवण आपण याठिकाणी जेवलो असल्याचे देखील आमीरने त्याला सांगितले. आमीर ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी इथले जेवण घरीसुद्धा पॅक करुन पत्नी किरण राव आणि मुलांसाठी नेले.  सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटाची कथा एका छोट्या मुलीच्या सिंगिंग करिअरवर आधारित आहे. तिला तिचा आवाज जगासमोर पोहोचवायचा असतो; मात्र वडिलांचा विरोध असल्यामुळे तिला याकरीता लढा द्यावा लागतो. तेथूनच तिचा संघर्ष सुरू होतो. पुढे ती सुपरस्टार बनते. या छोट्या मुलीच्या भूमिकेत जायरा वसीम बघावयला मिळणार आहे. तर यात आमीर खान चित्रपटात सुपरस्टारच्या भूमिकेत असून, त्याचे नाव शक्ती असते. तसेच सध्या आमीर त्याचा आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या शूटिंगमध्ये सुद्धा व्यस्त आहे. यात आमीर खानसह बिग बी अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात बिग बी आमीर खानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ALSO READ :  आमिर खानची मुलगी इरा बॉलिवूडमध्ये करणार एंट्री; ‘या’ दिग्दर्शकासोबत करीत आहे काम!