Join us

​बघा, ‘अझहर’मधील करणवीरचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 20:23 IST

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन याच्या आयुष्यावर बेतलेला ‘अझहर’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात अभिनेता ...

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन याच्या आयुष्यावर बेतलेला ‘अझहर’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात अभिनेता करणवीर यानेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ‘अझहर’मध्ये करणवीर मनोज नामक व्यक्तिरेखा साकारत आहे. अझहरच्या पतनास मनोज कारणीभूत होतो. मनोज, अझहरच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आणि व्यक्तिगत आयुष्यात कटकारस्थान करतो. ‘लोगो को पता चलना चाहिए की इंडिया में क्रिकेट के नाम पर और क्या क्या होता है ’ हा ट्रेलरच्या शेवटी ऐकू येणारा मनोजच्या अंदाजातील डॉयलॉग करणवीच्या आवाजातला आहे. मनोजच्या कॅरेक्टरसाठी करणवीरने अनेक तास घाम गाळला. यासाठी बॅटिंग आणि बॉलिंग शिकली. अर्थात बॉलिंग शिकण्यासाठी करणवीरला अधिक जास्त मेहनत करावी लागली. कारण बॉलिंगमध्ये स्विंग आणायचे होते, त्यामुळे करणवीरने यासाठी २ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घेतले. एवढेच नाही तर वॉईस अल्ट्रेशनही केले. तसेच ८० व्या दशकातील हेअरस्टाईल आणि मिशीही कॅरी केली....व्वा करणवीर, मान गयें बॉस!!!बालाजी मोशन पिक्चर्स व सोनी पिक्चर्स नेटवर्कनिर्मित ‘अझहर’ येत्या १३ मे रोजी प्रदर्शित होत आहे. इमरान हाश्मी यात अझहरची मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय नर्गिस फाकरी, प्राची देसाई, लारा दत्ता व गौतम गुलाटी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट केवळ बायोपिक नाही तर अझहरूद्दीनच्या काही रिअल लाईफ इंसिडेंटवर आधारित आहे.