Join us

पाहा : कल्कीचा ‘स्ट्रिप’ व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 20:11 IST

कल्की कोचलीन सध्या एका व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आहे. होय, या व्हिडिओत कल्की अंगावरचा एक एक कपडा काढून दुसरा घालताना दिसते. तुम्ही बघा तर!

कल्की कोचलीन आणि तिचे वडिल जोएल कोचलीन हे लवकरच एका ट्रॅव्हल शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार बातमी आम्ही तुम्हाला दिलीच.या शोअंतर्गत कल्की तिच्या वडिलांसह ४००० किमीचा प्रवास करणार आहे. या शोमुळे कल्की चर्चेत आहेच. पण सध्या एका व्हिडिओमुळे कल्की चांगलीच चर्चेत आहे. होय, कल्कीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कल्की ‘स्ट्रिप’ करताना दिसते आहे. फॅशन डिझाईनर रितु कुमारच्या लेबलच्या प्रमोशनसाठी कल्कीचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. या लेबलअंतर्गत महिलांसाठीच्या अंतर्वस्त्राची जाहिरात करण्यात आली आहे. अतिशय कल्पक पद्धतीने शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओत कल्की अंगावरचा एक एक कपडा काढून दुसरा घालताना दिसते. तेव्हा तुम्ही बघा तर!