Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा : ‘काबिल’चे फर्स्ट पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 19:48 IST

हृतिक रोशन याचा ‘काबिल’ हा सिनेमा यावर्षी येऊ घातला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. यात पोस्टरमध्ये ...

हृतिक रोशन याचा ‘काबिल’ हा सिनेमा यावर्षी येऊ घातला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. यात पोस्टरमध्ये हृतिकचे केवळ डोळे दाखवले आहेत. संजय गुप्ता दिग्दर्शित आणि राकेश रोशन निर्मित या चित्रपटात हृतिकच्या अपोझिट यामी गौतम दिसणार आहे. पुढील वर्षी २६ जानेवारीला ‘काबिल’ रिलीज होतो आहे. याच तारखेला शाहरूखचा ‘रईस’ हा सिनेमाही रिलीज होत आहे. अलीकडे ‘रईस’ची रिलीज डेट लांबवण्यात आली होती. सिनिअर रोशन  यामुळे संतापल्याचे वृत्त आहे. ‘काबिल’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यास ते राजी नसल्याचे वृत्त आहे म्हणे. तेव्हा बॉक्सआॅफिसवर ‘काबिल’ विरूद्ध ‘रईस’ हा संघर्ष कसा रंगतो, ते बघूच..तूर्तास तरी ‘काबिल’चे फर्स्ट पोस्टर बघायला हवे...