Join us

​पाहा : ‘कबाली’ अस्सल मराठीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 21:53 IST

कालच ‘कबाली’चा हिंदी रिमेक येणार अशी बातमी आपण वाचली. आता हा हिंदी रिमेक बनेल तेव्हा बनेल पण मराठीत मात्र ‘कबाली’ पाहता येणार आहे.

मेगास्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ने कमाईचे सगळेच रेकॉर्ड तोडले आहेत. विमानापासून मोबाईलच्या कव्हर ‘कबाली’चे पोस्टर्स झळकू लागले आहेत.‘कबाली’मधील रजनीच्या दाढीपासून त्याची वेशभूषा असा वेगळाच टेंडही सुुरू झाला आहे.एकंदर रजनीकांतच्या सगळ्या चाहत्यांना ‘कबाली’फिव्हर चढला आहे. असो, तर सांगायचे म्हणजे,कालच ‘कबाली’चा हिंदी रिमेक येणार अशी बातमी आपण वाचली. आता हा हिंदी रिमेक बनेल तेव्हा बनेल पण मराठीत मात्र ‘कबाली’ पाहता येणार आहे. होय,  फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर ‘बिईंग महाराष्ट्रीयन’ने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या एका व्हिडिओमध्ये ‘कबाली’ला अस्सल मराठी साज चढवण्यात आला आहे. ‘माईंड इट अ‍ॅन्ड शेअर इट’ असे म्हणत ‘बिईंग महाराष्ट्रीयन’ने प्रसिद्ध केलेला मराठीतल्या ‘कबाली’ व्हिडिओ तुम्हीही पाहायला हवाच!!