पाहा किती टॅक्स भरला आमीरने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 16:38 IST
आमीरचा दंगल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. आता आमीर दंगल ...
पाहा किती टॅक्स भरला आमीरने
आमीरचा दंगल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. आता आमीर दंगल या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ््याच कारणामुळे चर्चेत आला आहे. बॉलीवूडच्या हायेस्ट अॅडव्हान्स टॅक्स पेइंग अॅक्टर्समध्ये ऋतिक रोशन सद्या आघाडीवर आहे. यंदा मिड-डिसेंबर (१५ डिसेंबर) पर्यंत त्याने सर्वाधिक टॅक्स भरला आहे. ऋतिक या प्रकरणात सलमान आणि आमीर खानच्याही पुढे आहे. रिपोर्ट्सनुसार या आर्थिक वर्षात (२०१५-१६) थर्ड क्वार्टर (आॅक्टोबर ते डिसेंबर) ऋतिकने ८० कोटी रुपये अॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. तर गेल्या वर्षी याच काळात त्याने सर्वाधिक ५०कोटी रुपये टॅक्स भरला होता. तेव्हापासून आतापर्यंत ऋतिकच्या उत्पन्नात १५०० टक्के वाढ झाली आहे.दुसºयाा क्रमांकावर आमीर... मीडिया रिपोर्ट्सनुसार या यादीत दुसºया क्रमांकावर आमीर खान असून त्याने ७४ कोटी रुपये कर भरला आहे. त्याची कमाई ११२ कोटींनी वाढली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतिकचा यापूवीर्चा चित्रपट टङ्मँील्ल्नङ्म ऊं१ङ्म चे वर्ल्डवाइड बॉक्स आॅफिस कलेक्शन १०० कोटी होते. त्याच्या चित्रपटाला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. तरीही ऋतिकची कमाई चांगली झाली आहे. सलमान खान सप्टेंबर२०१६ म्हणजे दुसºया क्वार्टरपर्यंत या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. तोपर्यंत त्याने १६ कोटी टॅक्स भरला होता.मिड-डिसेंबरपर्यंत अॅडव्हान्स टॅक्स भरणाºया बॉलीवूड स्टार्सची लिस्ट..ऋतिक रोशन : ८० कोटी आमीर खान : ७४ कोटी रणबीर कपूर : ३७ कोटी सलमान खान : १४ कोटी अक्षय कुमार : १० कोटी दीपिका पादुकोण : ३ कोटी करीना कपूर : ७० लाख