SEE HOT PIC : मधुर भांडारकरच्या ‘या’ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लावला बोल्डनेसचा तडका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 17:50 IST
मधुर भांडारकर यांच्या ‘कॅलेंडर गर्ल्स या चित्रपटातून बी-टाउनमध्ये डेब्यू केलेलीअभिनेत्री रुही सिंग सध्या इन्स्टाग्रामवर बोल्डनेसचा जबरदस्त तडका लावताना दिसत ...
SEE HOT PIC : मधुर भांडारकरच्या ‘या’ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लावला बोल्डनेसचा तडका!
मधुर भांडारकर यांच्या ‘कॅलेंडर गर्ल्स या चित्रपटातून बी-टाउनमध्ये डेब्यू केलेलीअभिनेत्री रुही सिंग सध्या इन्स्टाग्रामवर बोल्डनेसचा जबरदस्त तडका लावताना दिसत आहे. कारण तिचे इन्स्टाग्राम अकाउंट सिजलिंग फोटोंनी अक्षरश: तुडुंब भरलेले आहे. बºयाचशा फोटोंमध्ये रुही बिकिनी बॉडी प्लान्ट करताना दिसत आहे. अभिनयाअगोदर मॉडलिंग करीत असलेल्या रुहीचे हे फोटो मात्र सध्या चर्चेचा विषय ठरत असून, तिच्या फॅन्सकडून या फोटोंना जबरदस्त लाइक्स मिळत आहेत. १६ आॅगस्ट १९९१ मध्ये जयपूर येथे जन्मलेल्या रुहीने शिक्षण घेतानाच मॉडलिंग क्षेत्रात एंट्री केली. पुढे तिने फेमिना मिस इंडिया या स्पर्धेतही सहभाग घेतला होता. आपल्या बोल्डनेसने तिने अल्पावधीतच मॉडलिंग क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केला. वयाच्या १७व्या वर्षी ती मिस टीन दीवा फायनलिस्ट सुद्धा बनली होती. मात्र रुहीला मॉडलिंगबरोबरच अभिनयातही आवड असल्याने तिचा पूर्वीपासूनच अभिनयाकडे कल राहिला आहे. पुढे २०१२ मध्ये रुहीने ‘द वर्ल्ड बिफोर’ या डॉक्युमेंट्रीतून आपल्या अभिनयास सुरुवात केली. ज्यासाठी तिला अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या आॅफर्सही मिळू लागल्या. कॅलेंडर गर्ल्स (२०१५), इश्क फॉरएव्हर (२०१६) या चित्रपटांमध्ये रुहीने आपल्या अभिनयाचा जलवा दाखविला. सध्या रुही ‘रोड थ्रिलर बोंगू’ या तामिळ चित्रपटात काम करीत आहे. दरम्यान, रुहीच्या या फोटोंमध्ये सध्या ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये चर्चेत आली आहे. कारण रुहीचे बिकिनी फोटोज् आग लावणारे असून, अनेक दिग्दर्शकांकडून तिला पुन्हा एकदा चित्रपटांच्या आॅफर्स मिळण्याची शक्यता आहे. रुहीने मॉडलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात केल्याने, फोटोंमधील रुहीच्या किलर अंदाजाने तिचे फॅन्स नक्कीच घायाळ होत असतील यात शंका नाही.