पाहा: ‘हॅपी भाग जायेगी’ करणार हॅपी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 16:02 IST
लाईम लाईटपासून दूर असलेले अभय देओल आणि डायना पेंटी लवकरच जोरदार पुनरागमन करणार आहेत. होय, दोघेही ‘हॅपी भाग जायेगी’ ...
पाहा: ‘हॅपी भाग जायेगी’ करणार हॅपी!!
लाईम लाईटपासून दूर असलेले अभय देओल आणि डायना पेंटी लवकरच जोरदार पुनरागमन करणार आहेत. होय, दोघेही ‘हॅपी भाग जायेगी’ या चित्रपटात झळकणार आहेत. आज ‘हॅपी भाग जायेगी’चे मोशन पोस्टरही रिलीज झाले. डायनाने चित्रपटाचे पोस्टर तिच्या टिष्ट्वटर हँडलवर शेअर केले आहे. ‘आॅफिशिअल मोशन पोस्टर आलेय...पाहिले नाहीत तर हॅपी भाग जायेगी’ असे तिने लिहिले आहे. हा चित्रपट म्हणजे इरोज इंटरनॅशनल व आनंद एल रॉय यांचे प्रॉडक्शन हाऊस ‘कलर यल्लो’यांचे को-प्रॉडक्शन आहे. ‘रांझणा’ व ‘तनु वेड्स मनु’नंतर त्यांचा हा तिसरा प्रोजेक्ट आहे..आता ‘हॅपी भाग जायेगी’ किती हॅपी करते ते बघूयात...