Join us

​ पाहा : ‘बॅटल ऑफ सारागढी’तील रणदीपचा फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 22:12 IST

‘सरबजित’नंतर रणदीप हुड्डा दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटात एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. होय, संतोषी यांच्या ‘बॅटल आॅफ सारागढी’ ...

‘सरबजित’नंतर रणदीप हुड्डा दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटात एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. होय, संतोषी यांच्या ‘बॅटल आॅफ सारागढी’ या चित्रपटात रणदीप एक शिख व्यक्तिरेखा साकारणार आहे. निश्चितपणे ही भूमिका रणदीपच्या आधीच्या सर्व भूमिकांपैकी वेगळी व आव्हानात्मक आहे. चित्रपटाचे कथानक  १८९७ च्या लढाईत  वीरमरण आलेल्या २१ शीखांवर आधारलेले आहे.  या लढाईत ब्रिटीश आर्मीच्या शिख रेजिमेंटच्या  २१ शिपायांनी प्राणांचे बलिदान देत तब्बल दहा हजार अफगाणींना रोखून धरले होते.  रणदीप या चित्रपटात हवालदार ईश्वर सिंह याची भूमिका साकारताना दिसणार आहे.   १२ सप्टेंबरपासून अमृतसरच्या सारागढी गुरुद्वारातून या चित्रपटाच्या चित्रीकरणास शुभारंभ होणार  आहे. ‘बॅटल आॅफ सारागढी’ याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आधारीत अभिनेता अजय देवगणचा ‘सन्स आॅफ सरदार’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सन्स आॅफ सरदार’ची पहिली झलकही नुकतीच अजय देवगणने ट्विट केली होती. त्यामुळे जवळपास एकसारख्याच कथानकावर आधारित दोन चित्रपट नजिकच्या काळात आपणास पाहायला मिळणार आहेत. अर्थात यापैकी कोणता चित्रपट तुमच्या आमच्या पसंतीत उतरतो, ते दिसेलच.