Join us

​ पाहा : ‘बॅन्जो’मधील ‘बाप्पा’ गाण्याचा टीजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 22:06 IST

‘बॅन्जो’मधील ‘बाप्पा..’ हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे. आजच या गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर हे गाणे धम्माल करणार, असे गाण्याचा टीजर पाहिल्यानंतर तरी वाटते आहे.

‘ग्रेट ग्रँड मस्ती’नंतर रितेश देशमुख ‘बॅन्जो’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची निवड करताना रितेश सहसा चुकत नाही.‘बॅन्जो’ या चित्रपटालाही हे लागू आहे. किमान या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तरी तसेच वाटते. यात रितेशने एका बॅन्जो कलाकाराची भूमिका साकारली आहे.‘बॅन्जो’मधील ‘बाप्पा..’ हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे. आजच  या गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर हे गाणे धम्माल करणार, असे गाण्याचा ट्रेलर पाहिल्यानंतर तरी वाटते आहे. यापूर्वी हृतिकच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील ‘देवा श्रीगणेशा..’ हे गाणे तुफान गाजले होते.  येणाºया गणेशोत्सवात  ‘देवा श्रीगणेशा..’ची जागा कदाचित ‘बॅन्जो’तील ‘बाप्पा..’ घेईल,असेच दिसतेय..