फोटो साभार
या नव्या फोटोत रणबीर व माहिरा यांचा ‘क्लोजनेस’ नोट करण्यासारखा आहे. माहिरा बसलेली आहे तर रणबीर तिच्या अगदी जवळ उभा आहे. हा फोटो पाहता दोघेही एकमेकांशी अतिशय कम्फर्टेबल असल्याचे दिसतेय. आता हा ‘क्लोजनेस’ बघता रणबीर व माहिराच्या रिलेशनशिपची कशी रोखणार?
ALSO READ : SEE PICS : कॅमे-यात कैद झाली रणबीर कपूरची नवी गर्लफ्रेन्ड! ‘इंटिमेट’ फोटो व्हायरल!!
खरे तर हे फोटो नेमके कुठले आणि कधीचे आहेत, हे कळायला मार्ग नाही. काहींच्या मते, हे फोटो न्यूयॉर्कच्या एका हॉटेलबाहेरचे आहेत. तर काहींच्या मते, हे फोटो दुबईतील आहेत. याचवर्षी जुलैमध्ये संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटींगसाठी रणबीर न्यूयॉर्कमध्ये होता. त्यावेळी माहिरा दुबईत होती. यादरम्यान रबणीर माहिराला भेटायला दुबईला गेला होता. माहिरा ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. त्याच हॉटेलबाहेरचे हे फोटो असल्याचे काहींचे म्हणणे आहे. पण या फोटोंमुळे पाकिस्तानींचे माथे मात्र ठणकले आहेत. ‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’ अशा प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटत आहे.