पाहा : अक्षयने मानले कुणाचे आभार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 22:33 IST
अक्षय कुमार म्हणजे सतत हटके करणारा आणि हटके वागणारा अभिनेता. यावेळी त्याचा हटके अंदाज पाहून तुम्हीही नव्याने त्याच्या प्रेमात पडाल. अक्षयचा ‘रुस्तम’ अलीकडेच प्रदर्शित झाला आणि बॉक्सआॅफिसवरही हिट ठरला. या यशासाठी अक्षयने बॉलिवूडच्या काही सहकलाकारांचे आभार मानले आहेत.
पाहा : अक्षयने मानले कुणाचे आभार!
अक्षय कुमार म्हणजे सतत हटके करणारा आणि हटके वागणारा अभिनेता. यावेळी त्याचा हटके अंदाज पाहून तुम्हीही नव्याने त्याच्या प्रेमात पडाल. अक्षयचा ‘रुस्तम’ अलीकडेच प्रदर्शित झाला आणि बॉक्सआॅफिसवरही हिट ठरला. या यशासाठी अक्षयने बॉलिवूडच्या काही सहकलाकारांचे आभार मानले आहेत. बॉलिवूडमधील अनेकजण अक्षयचा ‘रुस्तम’ प्रमोट करताना दिसले होते. यात आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा,वरूण धवन, सलमान खान आदींचा समावेश आहे. अक्षयने या सर्वांचे आभार मानण्यासाठी एक रॅप तयार केले आणि ते गायले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजतो आहे. या रॅप व्हिडिओत अक्षय पलंगावर चढून होला-हूप करताना आणि सर्वांचे आभार मानताना दिसतो आहे. केवळ एवढेच नाही तर या व्हिडिओद्वारे अक्षयने सर्व सहकलाकारांना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहे.