Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा : किंगखानची २५ वर्षे जुनी शॉर्टफिल्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 15:48 IST

बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरूख खान याची एक २५ वर्षे जुनी शॉर्ट फिल्म सध्या व्हायरल झाली आहे. शाहरूखच्या चाहत्यांसाठी ही शॉर्टफिल्म कुठल्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. तेव्हा बघा तर!!

बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरूख खान याची एक २५ वर्षे जुनी शॉर्ट फिल्म सध्या व्हायरल झाली आहे. शाहरूखने अपार संघर्ष करीत यश मिळवले. दूरदर्शनवरच्या ‘फौजी’, ‘सर्कस’ या शाहरूखच्या मालिका चांगल्याच गाजल्या. या मालिका तुम्हाला आजही आठवत असतील. पण शाहरूखने एका शॉर्टफिल्ममध्येही काम केले होते. सध्या ही शॉर्टफिल्म व्हायरल झाली आहे. ‘महान कर्ज’ नामक ही शॉर्टफिल्म आहे सन १९९१ची. यात शाहरूखने एका श्रीमंत व चतूर व्यक्तिची भूमिका साकारली आहे. तो बुद्धिवान असतो पण त्याच्यात काही त्रूटीही असतात.  यात १७ मिनिटांच्या शॉर्टफिल्म मध्येही शाहरूखने शानदार अभिनय केला आहे. शाहरूखच्या चाहत्यांसाठी ही शॉर्टफिल्म कुठल्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. तेव्हा बघा तर!!