कॅटरिना कैफच्या ‘त्या’ ड्रेसचे रहस्य अखेर उलगडले, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 22:11 IST
अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्या ड्रेसचे रहस्य अखेर उलगडले असून, तिने तो ड्रेस का परिधान केला याबाबतचा आता उलगडा झाला आहे.
कॅटरिना कैफच्या ‘त्या’ ड्रेसचे रहस्य अखेर उलगडले, जाणून घ्या!
नुकतेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा श्लोका मेहताबरोबर साखरपुडा पार पडला. या अतिशय रंगारंग सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या स्टायलिश अंदाजात हजेरी लावून सोहळ्यात चारचॉँद लावले. विशेषत: सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या अभिनेत्रींनी परिधान केलेल्या ड्रेसमुळे त्या खूपच आकर्षक दिसत होत्या. ऐश्वर्या राय, आमिर खानची पत्नी किरण रावसह इतरही बºयाचशा अभिनेत्री एकमेकींना टसन देताना दिसून आल्या. मात्र यामध्ये अभिनेत्री कॅटरिना कैफ खूपच सिम्पल आणि सोबर लूकमध्ये बघावयास मिळाल्याने अनेकांना धक्का बसला. कारण ज्या अंदाजात कॅटरिना या सोहळ्यात उपस्थित होती, त्यावरून लोकांनी तिचा ड्रेस बघून तिच्याकडे दुर्लक्ष केले जाण्याची शक्यता अधिक होती. परंतु कॅटने घातलेला हा ड्रेस स्वस्त नसून खूप महागडा असल्याचा खुलासा आता झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कॅटरिनाने घातलेला हा ड्रेस फॉल विंटर कलेक्शनची डिझायनर लेबल लुइसा बॅकारियाने डिझाइन केला होता. विशेष म्हणजे कॅटलाच हा ड्रेस पसंत आल्याने, तिने तो परिधान करण्याचा विचार केला. वास्तविक कॅट नेहमीच पार्टीत किंवा समारंभात हजेरी लावताना आपल्या ड्रेसवर फोकस करीत असते. तिच्या पहेरावाची मीडिया आणि फॅशन जगतात नेहमीच चर्चाही होत असते. दरम्यान, आकाश अंबानी आणि श्लोका मेहताचा साखरपुडा गोव्यात पार पडला. आकाश देशातील सर्वांत श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आहे, तर श्लोका जगातील सर्वांत मोठ्या हिरे व्यापार करणाºया रोजी ब्लू एम्पायर कंपनीचे मालक रसेल मेहता यांची लहान मुलगी आहे. आकाश आणि श्लोका या दोघांचेही शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. तेथूनच या दोघांमध्ये मैत्रीचे अंकुर फुलले.