खरे तर नोवाक विवाहित आहे. पण सध्या नोवाकचे वैवाहिक आयुष्यातही वादळ घोंघावत असल्याचे कळतेय. जोकोविच व त्याची पत्नी येलेना यांच्या नात्यातील तणाव सध्या वाढला आहे. गेल्या १८ महिन्यांपासून दोघांमध्येही वाद होत आहेत. याचे कारण म्हणजे सध्या नोवाकचे नाव अनेक महिलांशी जोडले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे नाव उक्रेनची वकील महिला व्हिक्टोरियासोबत जोडले गेले होते. डिजे लेडी ली नामक महिलेसोबतही जोकोविचच्या अफेअरची चर्चा रंगली होती. आता जोकोविच व दीपिकाच्या रिलेशनचीच चर्चा आहे. सर्वप्रथम गतवर्षी दीपिका व जोकोविचच्या डिनरडेटची बातमी समोर आली होती. दोघांनीही लॉस एंजिल्समधील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेट एन्जॉय केली होती. या डिनर डेटसाठी दोघेही एकाच कारमधून रेस्टॉरंटमध्ये गेले होते.
ALSO READ : दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल लूक’ तुम्हाला करून देईल परिकथांची आठवण!
दीपिका व रणवीर सिंह हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, असे सगळे मानत असताना जोकोविचच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीने केलेला दावा निश्चितपणे धक्कादायक आहे. आता यात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. दीपिका आता यावर काय खुलासा करते, ते बघुयात!!