‘दंगल’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 19:41 IST
आमीर खानचा बहुचर्चित चित्रपट ‘दंगल’चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरमध्ये आमीर आपल्या मुलींसह एका गल्लीत ...
‘दंगल’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज
आमीर खानचा बहुचर्चित चित्रपट ‘दंगल’चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरमध्ये आमीर आपल्या मुलींसह एका गल्लीत उभा असून त्याच्या मागे चारही मुली उभ्या आहेत. लढाऊ बाण्यात उभ्या असलेल्या मुलींच्या चेहºयावर आत्मविश्वास झळकतो आहे हे या पोस्टरचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. ‘दंगल’ या चित्रपटाचे पोस्टरसह आतापर्यंत दोन गाणी रिलीज करण्यात आली असून दोन्ही गाणे चांगलीच प्रसिद्धी मिळवित आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘धाकड’ हे गाणे रिलीज करण्यात आले होते. यात आमीरच्या मुलींची अखाड्यात एंट्री दाखविण्यात आली होती. आमीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘दंगल’चे नवे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवर ‘म्हारी छोरीया छोरो से कम हे के’ ही टॅग लाईन कायम ठेवण्यात आली आहे. }}}} ‘दंगल’च्या पोस्टर व गाण्यांच्या रिलीजवरून चित्रपटाची कथा उलगडत जात त्याबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिल्या पोस्टरमध्ये आमीर आपल्या चार मुलींसोबत असल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर ट्रेलर लाँच करण्यात आले. यात चित्रपटातील अनेक गोष्टींचा सारांश दाखविण्यात आला होता. या पाठोपाठ ‘हानिकारक बापू’ हे गाणे रिलीज करण्यात आले. यात आपल्या मुलींना तो कुश्तीचे धडे देताना दिसत होता. त्याच्या या कडक शिस्तीला मुली कंटाळल्या असून त्या ‘हानिकारक बापू’ हे गाणे गात आहेत. तर ‘धाकड’मध्ये पूर्ण तयारीनिशी उत्तरलेल्या मुली मैदानात बाजी मारताना दिसल्या. यानंतर रिलीज करण्यात आलेले पोस्टर कथा समोर घेऊन जाताना नवे आव्हान पेलण्यास आम्ही सज्ज आहोत असाच मॅसेज देत आहेत. पहेलवान महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित या दंगल या चित्रपटाला मिळाºया रिस्पॉन्स बद्दल आमीरने चाहत्यांचे आभार मानले आहे.