परंतु याचदरम्यान शाहरूख खान मोटारबोटने येणार असल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना समजली. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोकांनी याठिकाणी गर्दी केली. शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते अक्षरश: आतुर झाले होते. मात्र शाहरूखच्या उत्साही चाहत्यांमध्ये आमदार जयंत पाटील यांना त्यांच्या मोटारबोटपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच मशगत करावी लागली. गर्दीतून वाट काढताना काही चाहत्यांनी तर त्याला धक्काबुक्कीही केली. त्यामुळे मोठ्या मुश्किलने ते त्यांच्या मोटारबोटमध्ये पोहोचले.
त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी बघितले की, शाहरूख खानची बोटही त्याठिकाणी उभी आहे. शाहरूखच्या बोटीमुळे जयंत पाटील यांची बोट किनाºयांपर्यंत येऊ शकत नव्हती. त्यामुळे त्यांचा पारा आणखीच चढला. पुढे ते शाहरूखच्या बोटवर चढले आणि त्याला असे काही सुनावले की, सर्व दंग राहिले. विशेष म्हणजे यादरम्यान शाहरूख एक शब्दही बोलला नाही. जयंत पाटील यांचा अवतार बघून त्याने शांत राहणे पसंत केले. पाटील यांनी शाहरूखला म्हटले की, ‘तू असशील कुठला सुपरस्टार, परंतु याठिकाणचा तू सुपरस्टार नाहीस’
त्यानंतर पाटील आरडाओरड करीतच त्यांच्या मोटारबोटमध्ये बसले आणि तेथून निघून गेले. ज्यावेळी पाटील शाहरूखवर ओरडत होते, त्यावेळी शाहरूखचे चाहते त्याच्या बाजूने घोषणा देत होते. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ शाहरूखच्या चाहत्याने मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. पुढे हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर जयंत पाटील यांच्यावर शाहरूख चाहत्यांकडून प्रचंड टीकाही करण्यात आली.
#WATCH: Jayant Patil, Maharashtra MLC from Alibaug, heckled Shah Rukh Khan for not coming out of his yacht at Alibaug Jetty (Mobile video) pic.twitter.com/lq5owiKZnw— ANI (@ANI) November 11, 2017