दहा वर्षानंतर पुन्हा एकत्र येणार ‘सावरियां’ जोडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 12:14 IST
रणबीर कपूर आणि सोनम कपूर या जोडीने संजय लीला भन्साळींच्या ‘सावरियां’मधून मोठ्या धडाक्यात बॉलिवूड डेब्यू केले होते. अर्थात बॉक्सआॅफिसवर ...
दहा वर्षानंतर पुन्हा एकत्र येणार ‘सावरियां’ जोडी!
रणबीर कपूर आणि सोनम कपूर या जोडीने संजय लीला भन्साळींच्या ‘सावरियां’मधून मोठ्या धडाक्यात बॉलिवूड डेब्यू केले होते. अर्थात बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकला नव्हता. आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. होय, ऐकता ते अगदी खरे ऐकताय. राजकुमार हिराणी यांच्या अभिनेता संजय दत्त याच्यावरील बायोपिकमध्ये रणबीरसोबत सोनम झळकणार असल्याची खबर आहे. म्हणजे तब्बल दहा वर्षानंतर रणबीर व सोनमची जोडी पुन्हा एकदा बिग स्क्रीन शेअर करताना दिसेल. ८० ते ९०च्या दशकात संजय दत्तच्या ख-याखु-या आयुष्यात बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री येऊन गेल्यात. संजू बाबाचे हे खरेखुरे आयुष्य पडद्यावर उतवायचे झाल्यास त्याचा भूतकाळही पडद्यावर जिवंत होणार. त्यामुळेच संजयच्या आयुष्यात येऊन गेलेल्या अभिनेत्रींचा उल्लेखही या चित्रपटात येणार. सोनम नेमकी हीच भूमिका साकारणार असल्याचे कळते. पण ती कुण्या एका विशिष्ट अभिनेत्रीची नाही तर संजयच्या आयुष्यात येऊन गेलेल्या अनेक अभिनेत्रींच्या रूपात एक प्रतिकात्मक भूमिका वठवताना दिसेल. आधी सोनमच्या या भूमिकेसाठी दीपिका पादुकोण, कंगना राणौत ते कॅटरिना कैफ अशा अनेक अभिनेत्रींची नावे चर्चेत होती. मात्र अखेर सोनमच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. नव्या वर्षांत रणबीर या बायोपिकचे शूटींग सुरु करणार आहे. यात तो तीन वेगवेगळ्या हटके लूकमध्ये दिसणार असल्याचीही चर्चा आहे. केवळ सोनमच नाही तर ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील रणबीरची को-स्टार अनुष्का शर्माही या बायोपिकमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहे. यात ती एका महिला पत्रकाराची भूमिका साकाताना दिसेल.