Join us

​समाजासाठी सरसावली रिचा चड्ढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 16:34 IST

बॉलिवूडमधील अनेक कलाकार समाजासाठी काहीतरी करताना दिसतात. अभिनेत्री रिचा चड्ढा यापैकीच एक़ समाजाला मदतीचा हात देणारी रिचा आता ‘केटो’ ...

बॉलिवूडमधील अनेक कलाकार समाजासाठी काहीतरी करताना दिसतात. अभिनेत्री रिचा चड्ढा यापैकीच एक़ समाजाला मदतीचा हात देणारी रिचा आता ‘केटो’ या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जुळली आहे. अभिनेता कुणाल कपूर याच्याद्वारे संचालित ‘केटो’ लोकांना सामाजिक कार्यांत सामावून घेत विविध सामाजिक कार्यांसाठी निधी गोळा करतो. आता ‘केटो’ने ‘पूर्णता’ या स्वयंसेवी संस्थेला मदतीचा हात देऊ केला आहे. ‘पूर्णता’ ही मानवी तस्करीतून सुटका झालेल्या महिलांसाठी काम करणारी एनजीओ आहे. मुंबईतील ही संस्था या महिलांना विविध प्रशिक्षण देत त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी झटते आहे. ‘केटो’ आता ‘पूर्णता’साठी निधी गोळा करणार आहे. या प्रयत्नांना रिचा चड्ढा ही सु्द्धा सामील झाली आहे. समाजासाठी काही करण्याइतपत सक्षम व्हावे, असे मला वाटायचे. समाजासाठी काही करण्याची इच्छाच तुम्हाला एक खरा कलाकार बनवते, असे रिचा म्हणाली. व्वा रिचा...वेल डन!