Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र आई करीना कपूरसोबत सारा अली खानचं असं आहे बॉण्डिंग, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 17:41 IST

सारा अली खान आणि तिची सावत्र आई अभिनेत्री करिना कपूर यांच्यात नातं कसं आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची आई अमृता सिंगपासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खानने २०१२ साली बॉलिवूडची बेबो करीना कपूरशी लग्न केले. त्यामुळे सारा आणि इब्राहिम यांचे करीनाशी नातं कसं असेल हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. नुकताच सारा आणि करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आणि या व्हिडिओत या दोघांमधील बॉण्डिंग पहायला मिळत आहे.

साराने नुकतेच करीना कपूरचा रेडिओ शो व्हॉट विमेन वॉन्टमध्ये हजेरी लावली होती. या शोच्या शूटिंगनंतर सारा आणि करिना एकत्रच बाहेर पडले. त्यावेळचा त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. शूटिंग संपवून बाहेर पडल्यावर सारा आणि करिनानं एकमेकींची गळाभेट घेत निरोप घेतला. त्यांच्या या व्हिडीओवर सध्या सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सेलिब्रेटी पेज या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सारा चेक्स शर्ट आणि शिमरी शॉर्ट स्कर्टमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तर दुसरीकडे कारिना कपूर पिंक कलरच्या आउटफिट्समध्ये सुंदर दिसत आहे.

साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत लव आज कल या चित्रपटात दिसणार आहे.

हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. तर करीना कपूर लवकरच आमिर खानसोबत लाल सिंग चढ्ढा या चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :करिना कपूरसारा अली खानसैफ अली खान अमृता सिंग