Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानच्या चित्रपटात वाढली ‘मॉम’ची लुडबूड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 11:00 IST

सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र येत आहेत, हे तुम्ही जाणताच.  ‘केदारनाथ’मधील या दोघांची ...

सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र येत आहेत, हे तुम्ही जाणताच.  ‘केदारनाथ’मधील या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत. याशिवाय सारा अली खानचा  डेब्यू सिनेमा म्हणूनही ‘केदारनाथ’ पाहायला  लोक आतूर आहेत.  सुशांत व साराच्या याच चित्रपटासंदर्भात एक बातमी आहे. बातमी काय तर सारा अलीची मॉम अमृता सिंह (सैफ अली खानची एक्स वाईफ ) हिची वाढती लुडबूड. होय,अमृताची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’मध्ये लीड रोलमध्ये आहे. आता साराच्या काळजीने म्हणा किंवा तिच्या पहिल्या डेब्यू सिनेमाच्या यशाच्या चिंतेने म्हणा, पण अमृताने ‘केदारनाथ’मध्ये जरा जास्तच लुडबूड चालवल्याचे कळतेय. साराने ‘केदारनाथ’ साईन केला, त्यावेळी अमृता हजर होती. चित्रपटाच्या स्क्रिप्ट रिडींगलाही अमृता होतीच.यापुढे जात आता म्हणे, चित्रपटासंदर्भातील प्रत्येक गोष्टीत तिची ढवळाढवळ वाढलीय.  ALSO RAED : ​सोनम कपूर होती शो स्टॉपर; पण भाव खावून गेली सारा अली खान!अर्थात साराचा याचित्रपटातील हिरो सुशांत सिंह राजपूत याला याबाबत विचारल्यावर त्याने मात्र यास नकार दिला आहे. असे काहीही नाही. मला जी स्क्रिप्ट देण्यात आली होती, त्यात एकही बदल सुचवला गेलेला नाही. स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचली, तेव्हाच मी त्याला होकार दिला होता. मी प्रामाणिक आहे आणि शंभर टक्के प्रोफेशनलही. त्यामुळे कुणाच्याही पालकांचे वा मित्रांची ढवळाढवळ खपवून घेण्याचा प्रश्नच नाही, असे सुशांतने स्पष्ट केले आहे.आता सुशांत म्हणतोय तर त्यावर विश्वास  ठेवावाच लागेल. पण साराच्या करिअरबद्दल अमृता जरा अधिकच सजग आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अगदी साराच्या मित्रांपासून, तिच्या ड्रेसिंग स्टाईलपर्यंतच्या बारीकसारीक गोष्टींवर अमृताचा डोळा असतो, ते उगाच नव्हे!