Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयला इंप्रेस करायचा 'सारा' प्रयत्न फसला, खिलाडीकुमार म्हणाला- 'ये तो घटिया'...

By गीतांजली | Updated: December 22, 2020 14:09 IST

सारा अली खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सारा अली खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अक्षय कुमारला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. हा व्हिडिओ ताजमहालसमोरचा आहे, जिथे सारा तिच्या चुबबुल्या अंदाजात दिसते आहे.

यावेळी सारा अली खान, अक्षय कुमार आनंद एल. रॉय यांच्या 'अतरंगी रे' सिनेमाचे शूटिंग आग्रामध्ये करतायेत अभिनेता धनुष देखील क्रूबरोबर सामील झाला आहे.

सारा अली खानने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अक्षय कुमारची ओळख देताना दिसते आहे. या व्हिडिओमध्ये साराने अक्षय कुमारचा ऐतिहासिक पाहुणे म्हणून परिचय करून दिला आहे. यानंतर सारा अली खान काय म्हणतो ते ऐकून अक्षय कुमार डोक्याला हात लावतो. 

अक्षय कुमार पुढे म्हणतो की, 'तुम्ही पाहिले आहे की हिने यमक जुळवण्याचा प्रयत्न केला होता, याहुन खराब यमक जुळवण्याचा प्रयत्न आजपर्यंत झाला नसेल. पण जे प्रयत्न करतात ते हार मानत नाहीत, प्रयत्न करत राहतात.  यानंतर सारा अली खान ताजमहाल आणि प्रेमाचे किस्से सांगू लागते.

अक्षय कुमारची अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यामध्ये तो शाहजहांच्या स्टाईलमध्ये दिसतो आहे. सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुष स्टारर 'अतरंगी रे' हा 2021 मधील मोस्टअवेटेड सिनेमा आहे. या सिनेमाचे शूटिंग काही दिवस मदुरै येथे झाले होते. सध्या  संपूर्ण टीमने आग्रामध्ये काहीतरी विशेष शूट करते आहे. 

टॅग्स :सारा अली खानअक्षय कुमार