Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भटमुळे सारा अली खानवर आली रडायची वेळ, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 16:50 IST

साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. सारा अली खानने केवळ तीन सिनेमात काम केले आहे. 14 फेब्रुवारीला साराचा 'लव आज कल' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या सिनेमात तिच्या अपोझिट कार्तिक आर्यन दिसला होता. सारा एक व्हिडीओला घेऊन चर्चेत आली आहे. या व्हिडीओत ती रडताना दिसतेय. साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता.        

हा व्हिडीओ एका इव्हेंटमधला आहे. साराने यात खूप मस्ती केली आहे. या इव्हेंटमध्ये साराने गली बॉय सिनेमातले डायलॉग बोलताना दिसतेय. डायलॉग बोलता बोलता ती अचानक रडायला लागली. इव्हेंटमध्ये तिला तीन वेगवेगळ्या इमोशन्समध्ये हे डायलॉग बोलायले सांगितले होते.   

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ती सध्या तिच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुक आहे. अक्षयकुमार आणि धनुष यांच्यासोबत ती ‘अतरंगी रे’ या चित्रपटातून नव्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिका साकारणार आहे. ती अक्षयकुमार आणि धनुष यांच्या व्यक्तीरेखांसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खान