Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खाननं सोडली आई अमृता सिंहची साथ, घर सोडून जातानाचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 21:00 IST

कारमध्ये ठेवलेले सामानाचे बॉक्स आणि झाडाच्या कुंड्या म्हणजे सारा घर सोडून जात असल्याच्या तयारीत दिसत आहे. 

छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान गेल्या काही दिवसापासून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सिम्बा चित्रपटातील भूमिकेतून साराने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. या भूमिकेने साराला अभिनेत्री म्हणून नवी ओळख मिळवून दिली आहे. नुकताच साराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत सारा एका कारच्या मागच्या बाजूला उभी आहे. कारच्या मागच्या बाजूला डिक्कीत अनेक सामानाने भरलेले बॉक्स दिसत आहेत. कारमध्ये ठेवलेले सामानाचे बॉक्स आणि झाडाच्या कुंड्या म्हणजे सारा घर सोडून जात असल्याच्या तयारीत दिसत आहे. 

यावेळी सारा प्रचंड चिंताग्रस्त झाल्याचंही फोटोत पाहायला मिळत आहे. आईचे घर सोडून दुसरीकडे जातेस का असा प्रश्न हा फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी विचारला आहे. सारा किंवा तिच्या कुटुंबीयांनी मात्र सारा घर सोडून दुसरीकडे जात असल्याच्या या फोटोला दुजोरा दिलेला नाही. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत सेलिब्रिटींची मुलं पालकांचं घर सोडून वेगळ्या घरात राहण्याचा ट्रेंड सुरु आहे. यांत आलिया भट्ट, रणबीर कपूर, वरुण धवन असे अनेक स्टार किड्स आहेत ज्यांनी नवं स्वतःचे घर खरेदी केले आहे किंवा लवकरच खरेदी करणार आहेत. मात्र साराचा आईचं घर सोडण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. सारा आईचे घर सोडून कार्तिक आर्यनसोबत राहायला तर जात नाही ना अशी शंकासुद्धा अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केली आहे. 

टॅग्स :सारा अली खान