Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माहीत आहे का, २००५ मध्ये सारा अली खान झळकली होती कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 15:35 IST

साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावली होती. तिचे पुरस्कार सोहळ्यांदरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, सारा अनेक वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर देखील झळकली होती.

ठळक मुद्देसारा अली खानचा हा कौन बनेगा करोडपती कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बुधुवारी साराच्या एका चाहत्याने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला आहे आणि लव्ह सारा अली खान असे लिहिले आहे.

सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर ती सिम्बा या चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले. सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे. त्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावली होती. तिचे पुरस्कार सोहळ्यांदरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, सारा अनेक वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर देखील झळकली होती.

कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षकांचे अनेक वर्षांपासून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात सामान्य लोकांसोबत अनेक सेलिब्रेटींनी देखील हजेरी लावली आहे. २००५ मध्ये सैफ अली खान आणि प्रिती झिंटा यांचा सलाम नमस्ते हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सैफ आणि प्रितीने कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी चिमुकली सारा देखील सैफसोबत प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. सारा तिच्या मैत्रिणीसोबत प्रेक्षकांसोबत बसली होती आणि तिने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्यासोबत गप्पा देखील मारल्या होत्या. 

सारा अली खानचा हा कौन बनेगा करोडपती कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बुधुवारी साराच्या एका चाहत्याने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला आहे आणि लव्ह सारा अली खान असे लिहिले आहे. साराच्या चाहत्यांने १५ सेकंदाचा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता तो अनेकजणांनी आपल्या सोशल नेटवर्किंगच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच तिचे फॅन्स यावर प्रतिक्रिया देखील लिहित आहेत. तिच्या एका फॅनने लिहिले आहे की, साराला तिच्या पालकांनी खूप चांगले संस्कार दिले आहेत. त्याचप्रकारे प्रत्येकाने आपल्या मुलांना संस्कार देणे गरजेचे आहे. तर एकाने म्हटले आहे की, सारा चिमुकली असताना जितकी गोड होती, तितकी आज देखील आहे. 

 

टॅग्स :सारा अली खानकौन बनेगा करोडपती