Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावली सारा अली खान, सोनू सूदने केली प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 18:20 IST

सारा अली खानने कोरोनाच्या संकटात दिलेल्या योगदानासाठी ट्विटरवर सोनू सूदने कौतुक केले आहे.

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याचे पहायला मिळतंय. अशा बिकट परिस्थितीत अभिनेत्री सारा अली खान मदतीसाठी पुढे सरसावली आहे. तिने गरजूंसाठी ऑक्सिजन सिलेंडर विकत घेण्यासाठी सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

सारा अली खानने दिलेल्या योगदानासाठी तिचे आभार मानत सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात सोनू सूदने लिहिले की, सूद फाउंडेशनमध्ये योगदान दिल्याबद्दल माझी प्रेमळ सारा अली खानला खूप शुभेच्छा देतो. मला तुझ्यावर खूप गर्व आहे. तू चांगल्या कामाला अशारितीने प्रोत्साहन देत रहा. तू फक्त तुझे योगदान दिले नाहीस तर संपूर्ण तरूणाईला या कठीण काळात आपले योगदान देण्यासाठी प्रेरीत केले आहे. तू खरी हिरो आहेस.

सारा अली खानने कठीण काळात समाजासाठी दिलेल्या मदतीसाठी तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे. अनेकांसाठी ती प्रेरणास्त्रोत बनली आहे. काही आठवड्यांपूर्वी सारा अली खान काश्मीर ट्रीपला गेली होती. तिथे सारा कुटुंबासोबत गेली होती. यादरम्यानचे तिने फोटो शेअर केले होते. 

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती कुली नं १ चित्रपटात वरूण धवनसोबत झळकली होती. आता ती अक्षय कुमारसोबत अतरंगी रेमध्ये दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खानसोनू सूदकोरोना वायरस बातम्या