गणेशोत्सवामुळे देशभरउत्साहाचे वातावरण आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही या उत्साहात सामील आहेत. या यादीत अभिनेत्री सारा अली खान हिचेही नाव आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सारा बाप्पाच्या मूर्तीसमोर उभी आहे. पण सध्या साराच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. होय, या फोटोवरून साराला प्रचंड ट्रोल केले जात आहे.‘गणपती बाप्पा मोरया... गणेशजी तुमच्या सर्व समस्या दूर करून तुमच्या आयुष्यात आनंद, सकारात्मकता, यश आणि भरभराटीने आणतील,’ असे हा फोटो शेअर करताना साराने लिहिले. पण यानंतर लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.
‘तू मुस्लिम आहेस, असे मला वाटले होते,’ असे हा फोटो पाहून एका युजरने खोचकपणे लिहिले. तर एकाने साराला मर्यादेत राहा, अशी तंबी दिली.
एका युजरने साराला तिच्या नावातून अली खान हटवण्याचा सल्ला देत, माझ्या ‘इस्लाम’ला बदनाम करू नकोस, असे म्हटले. तर अन्य एका युजरने ‘तू मुस्लिम आहेस की हिंदू?’ असा सवाल तिला केला. साराने अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.