संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी जान्हवी कपूर पोहोचली ऑफिसमध्ये !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 10:50 IST
श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट धडकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिचे इशान खट्टरसोबतचे कोलकात्तामध्ये शूटिंगच्या ...
संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी जान्हवी कपूर पोहोचली ऑफिसमध्ये !
श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट धडकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिचे इशान खट्टरसोबतचे कोलकात्तामध्ये शूटिंगच्या वेळेचे फोटो व्हायरल झाले होते. ज्यात ती इशानसोबत बोलताना दिसत होती. याच यादरम्यान अशी माहिती मिळते आहे की दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी जान्हवीची भेट घेतली आहे. स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार नुकताच जान्हवी आणि खुशी कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. ही मिटिंग कदाचित जान्हवीच्या पुढच्या प्रोजेक्ट संदर्भात असू शकते असा अंदाज लावण्यात येतो आहे. जान्हवी सध्या धडकच्या कामात व्यस्त आहे याशिवाय तिच्याकडे सध्या कोणताच प्रोजेक्ट नाही आहे. अशात जान्हवीचे संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट घेणे ही गोष्ट तिच्या आगामी चित्रपटाकडे इशारा देते आहे. जर हे खंर मानले तर जान्हवीच्या डेब्यू आधीच तिला बिग बजेट चित्रपट मिळाला असे म्हणावे लागले आणि हि जान्हवीच्या करिअरच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाची बाब असेल. मात्र अजूनपर्यंत तरी जान्हवी कोणताच नवा प्रोजेक्ट साईन केलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार कदाचित जान्हवी संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाचा भाग बनू शकते. ALSO READ : पहिल्यांदाच सावत्र भाऊ अर्जुन कपूरच्या घरी गेल्या जान्हवी आणि खुशी कपूर!जान्हवी इशान खट्टरच्या अपोझिट बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. धडक हा मराठी चित्रपट 'सैराट'चा हिंदी रिमेक आहे. झिंग झिंग झिंगाट'च्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं.सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या.त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. यात इशान परश्या तर जान्हवी आर्ची बनून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या मुलीच्या लॉँचिंगची जबाबदारी करण जोहरवर सोडली होती. श्रीदेवींनी या चित्रपटासाठी जान्हवीला खास तयार केले होते. जान्हवीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून डान्सिंग क्लासपर्यंत सगळ्यांवर श्रीदेवींची नजर असायची. मुलीचा डेब्यू सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी आतूर होत्या. मात्र ते कदाचित त्यांच्या नशीब नव्हते. येत्या 6 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.