Join us  

भन्साळी पुन्हा एकदा बनवणार ‘पद्मावत’, ‘रामलीला’सारखा चित्रपट! रणवीर-दीपिकासोबतचं पुन्हा करणार काम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 9:23 PM

संजय लीला भन्साळी त्यांच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. भव्यदिव्य सेट, वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या कथा, त्याला साजेसे भरजरी पोशाख असे सगळे भन्साळींचे चित्रपट म्हटले की आपसूक डोळ्यांपुढे येते.

संजय लीला भन्साळी त्यांच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. भव्यदिव्य सेट, वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या कथा, त्याला साजेसे भरजरी पोशाख असे सगळे भन्साळींचे चित्रपट म्हटले की आपसूक डोळ्यांपुढे येते. त्यांचे गत तीन चित्रपट याची साक्ष देणारे आहेत. मग तो ‘रामलीला’ असो, ‘बाजीराव मस्तानी’ असो किंवा अगदी अलीकडे रिलीज झालेला ‘पद्मावत’ असो. या तिन्ही चित्रपटात भन्साळींच्या सिग्नेचर स्टाईलसोबतचं भव्यदिव्य सेट्स, आकर्षक पोशाख असे सगळे काही होते. हे तिन्ही चित्रपट कॉस्च्युम ड्रामा होते. ताजी बातमी मानाल तर, तूर्तास भन्साळींनी असेच चित्रपट बनवावेत, असा दबाव त्यांच्यावर आहे. खरे तर यावेळी भन्साळींच्या मूड काही वेगळाच होता. यावेळी त्यांना एक कॉमेडी चित्रपट बनवायचा होता. पण निर्मात्यांना मात्र त्यांची ही कल्पना जराही भावली नाही. भन्साळींनी आपली सिग्नेचर स्टाईल सोडता कामा नये, असे निर्मात्यांचे मत पडले. निर्मात्यांच्या या दबावामुळे भन्साळी पुन्हा एकदा कॉस्च्युम ड्रामा घेऊन येणार आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटातही भन्साळींचा आवडती जोडी अर्थात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांची वर्णी लागणार असे कळतेय. या जोडीसोबत भन्साळींनी आत्तापर्यंत तीन चित्रपट बनवलेत आणि हे तिन्ही चित्रपट तुफान गाजलेत. अलीकडे आलेल्या ‘पद्मावत’ने तर बॉक्सआॅफिसवर अभूतपूर्व यश मिळवले. यातील दीपिका व रणवीरच्या कामाचेही वारेमाप कौतुक झाले.अद्याप या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. त्यामुळेच पुढे काय होते, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. भन्साळी निर्मात्यांच्या दबावापुढे झुकतात की, हा दबाव झुगारून अन्य जॉनरच्या चित्रपटांत हात आजमावण्याच्या आपल्या आग्रहावर ठाम राहतात, यावर या चित्रपटाचे भविष्य अवलंबून असणार आहे.

 

 

 

टॅग्स :संजय लीला भन्साळीरणवीर सिंगदीपिका पादुकोण