Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय लीला भन्साळींच्या सिनेमात यावेळी दीपिका नाही तर ही अभिनेत्री करणार रणवीरसोबत रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 15:15 IST

आतापर्यंत संजय लीला भन्साळींच्या सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण असे समीकरण झाले होते.

पद्मावतनंतर संजय लीला भन्साळी यांनी त्याच्या पुढच्या सिनेमाची घोषणा केली आहे. संजय लीला भन्साळी यांचा पुढचा प्रोजेक्ट बैजू बावरा आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार हा सिनेमा 2021च्या दिवाळीत रिलीज होईल. अद्याप सिनेमातील स्टारकास्ट्ची घोषणा झालेली नाही, मात्र रिपोर्टनुसार रणवीर सिंगचे नाव फायनल झाल्याची चर्चा आहे. रणवीर यात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. जर ही माहिती खरी ठरली तर रणवीर तब्बल चौथ्यांदा संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात दिसले. याआधी त्याच्या गलियों की रामलीला रासलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावतमध्ये एकत्र काम केले आहे.   

संजय लीला भन्साळी यांनी यासंदर्भात रणवीरशी बोलणं देखील केले आहे. रिपोर्टनुसार बैजू बावरामध्ये मुख्य भूमिकेसाठी प्रियंका चोप्राचे नाव चर्चेत आहे. रिपोर्टनुसार सिनेमात प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग यात रोमान्स करताना दिसणार आहेत.  याआधी रणवीर आणि प्रियंकाने गुंडे, दिल धडकने दो आणि बाजीराव मस्तानीमध्ये स्क्रिन शेअर केली आहे. 

रणवीर सिंग याशिवाय 83 सिनेमा जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे. ८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.  

टॅग्स :प्रियंका चोप्रारणवीर सिंग