Join us

संजय लीला भन्साळी यांनी सुरू केले दुसऱ्या बिग बजेट चित्रपटाचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 13:31 IST

पद्मावतने कमाईचे नवे रेकॉर्ड बनवल्यानंतर संजय लीला भन्साळी आपल्या आगामी चित्रपटाच्या कामाला लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी ...

पद्मावतने कमाईचे नवे रेकॉर्ड बनवल्यानंतर संजय लीला भन्साळी आपल्या आगामी चित्रपटाच्या कामाला लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा बिग बजेट चित्रपटात तयार करणार आहेत. हा एक म्युझिकल एपिक चित्रपट असणार आहे. पद्मावतनंतर ब्रेक न घेता दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी आपल्या आगामी चित्रपटावर काम करायला सुरुवात केली आहे. हा चित्रपट ते आणि वायकॉम 18 मिळून तयार करणार आहेत. या चित्रपटाबाबत जास्त काही माहिती अजून मिळू शकलेली नाही. फक्त हा एक म्युझिकल रोमाँटिक कॉमेडी चित्रपट असणार असल्याची चर्चा आहे. अजून या चित्रपटाचे नाव देखील निश्चित झालेले नाही.   संजय लीला भन्साळी या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगला पुन्हा एकदा साईन करणार असल्याची देखील बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. या मागचे कारण म्हणजे दीपिकाने स्वत: सांगितले होते की तिला पुन्हा एकदा संजय लीला भन्साळींबरोबर काम करायचे आहे. तर भन्साळी यांनी ही दीपिका सोबतचा माझा प्रवास अजून पूर्ण झालेला नाही असे म्हटले होते. ALSO READ :   जणू माझ्या मुलांवर हल्ला होतोय, असे मला वाटत होते.... ! ‘पद्मावत’ वादावर बोलले संजय लीला भन्साळी !!पद्मावत रिलीजसाठी संजय लीला भन्साळी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. करणी सेनेने त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा दिल्या होत्या. सेन्सॉरने चित्रपटात अनेक बदल सुचवले ऐवढेच नाही तर चित्रपटाचे नावदेखील बदलायला लावले. मात्र या सगळ्या परिस्थितीचा सामना त्यांनी शांतपणे केला. याचा रिझल्ट प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला पहिल्या चार दिवसात चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमावला. याआधी संजय लीला भन्साळी साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची प्रेमकथा पडद्यावर मांडणार आहेत. यात अमृता प्रीतमच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्राच्या नावाचा विचार करण्यात आला होता. मात्र डेट्सच्या क्लैशमुळे तिने ही भूमिका नाकारली.