Join us

आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा सेट जमीनदोस्त, दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 16:39 IST

प्रॉडक्शनच्या टीमला सेट तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आलिया भट लवकरच 'गंगूबाई कठियावाडी'मध्ये दिसणार आहे. सिनेमाची शूटिंग आलिया भटने आधीच सुरु केली आहे. या सिनेमातील तिचा फर्स्ट लूकदेखील आऊट झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार गंगुबाईचा सेट तोडण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. प्रॉडक्शनच्या टीमला सेट तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे भाडे देणे आणि देखरेख करणं जास्त खर्चिक पडत होते. त्यामुळे सेट तोडण्यात आला. 

 या सिनेमात आलिया गंगूबाई कठियावाडीची भूमिका साकारणार आहे. आलिया या सिनेमात एका धमाकेदार रुपात महिला गँंगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. आलिया पहिल्यांदाच या चित्रपटातून एका महिला गँगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आलियाचा हा चित्रपट तिच्या पुढील करियरसाठी कलाटणी देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपटाची कथा ही हुसैन जैदी ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर बेतलेली आहे. पण खरी कथा ही गंगूबाई काठीयावाडी हिच्या आयुष्यावर आधारित आहे.

टॅग्स :आलिया भटसंजय लीला भन्साळी