ALSO READ : श्रीदेवीच्या निधनानंतर लहान मुलासारखे हमसून-हमसून रडले बोनी कपूर!
संजय कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. ‘शादी हँगओवर’ असे कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी आॅरेंज कलरचा कुर्ता घातला आहे. संजय कपूरनी हा फोटो पोस्ट केला आणि श्रीदेवींचे चाहते संतापून उठले. याचे कारण म्हणजे, संजय यांनी काल हा फोटो शेअर केलेला आहे. वहिणीचे पार्थिव दुबईत अडकून पडले असताना संजय कपूरला ‘शादी हँगओवर’ आठवावे, याचाच अनेकांना संताप आला. यावर अनेक युजर्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ‘लगता है आपमें भावनाएं नहीं है. टाईम देखो पोस्ट का’, असे एका युजरने लिहिले.
संजय कपूरसह अख्खे कपूर कुटुंब भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी दुबईत गेले होते. श्रीदेवीही याच लग्न सोहळ्यासाठी दुबईत गेल्या होत्या. हा लग्न सोहळा आटोपून कपूर कुटुंबीय मुंबईला परतले. पण श्रीदेवी दुबईतच थांबल्या होत्या. दुबईच्याच एका हॉटेलात शनिवारी रात्री श्रीदेवींना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. श्रीदेवीच्या अकाली मृत्युमुळे अख्खे कपूर कुटुंब धक्क्यात आहे. विशेषत: जान्हवी व खुशी या दोन्ही मुली आणि बोनी कपूर यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा पती बोनी कपूर त्यांच्याजवळ होते. खरे तर श्रीदेवींना सरप्राईज देण्यासाठी ते शनिवारीच मुंबईहून दुबईला गेले होते.