Join us

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये करिष्मा तन्ना दिसणार रणबीर कपूरसोबत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 16:28 IST

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री करिष्मा तन्ना ही रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार करिष्मा ही कॅमिओ रोल ...

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री करिष्मा तन्ना ही रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार करिष्मा ही कॅमिओ रोल करणार आहे. याबाबत करिष्माने सांगितले, ‘मी या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून काम करणार आहे. मी रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मी संजय दत्तच्या लव्ह इंटरेस्टची भूमिका करणार नाही. मात्र माझी भूमिका ही महत्त्वाची असणार हे नक्की. त्याच्या आयुष्यातील ज्या काही गोष्टी या चित्रपटात दाखविणार आहेत, त्यामध्ये माझी भूमिकाही असणार आहे.’या चित्रपटात रणबीर कपूर वेगवेगळ्या स्वरूपात दिसेल. या चित्रपटासाठी त्याने १३ किलो वजन वाढविले आहे. मी पहिल्या टप्प्यात खूप सारे वजन वाढविले. आता दुसºया टप्प्यात हे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये परेश रावल हा सुनील दत्तची भूमिका साकारणार आहे तर मनीषा कोईराला ही नर्गिसची भूमिका करणार आहे. या चित्रपटात सोनम कपूरचीही भूमिका असेल.१९८१ साली रॉकी या चित्रपटाने संजय दत्तने आपल्या कारकीर्दीस प्रारंभ केला. त्यानंतर अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला जेलमध्ये जावे लागले होते.