‘दत्त’ नाही तर ‘हे’ असेल संजय दत्तच्या बायोपिकचे नाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 12:34 IST
रणबीर कपूरचे चाहते संजय दत्तच्या बायोपिककडे डोळे लावून बसले आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या बायोपिकमध्ये अभिनेता संजय दत्तचा अख्खा ...
‘दत्त’ नाही तर ‘हे’ असेल संजय दत्तच्या बायोपिकचे नाव!
रणबीर कपूरचे चाहते संजय दत्तच्या बायोपिककडे डोळे लावून बसले आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या बायोपिकमध्ये अभिनेता संजय दत्तचा अख्खा जीवनपट मांडला जाणार आहे. रणबीर कपूरसह दीया मिर्झा, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचे शूटींग ब-याच दिवसांपासून सुरु आहे. पण आत्तापर्यंत या चित्रपटाचे नाव मात्र फायनल झालेले नव्हते. मध्यंतरी या बायोपिकचे शीर्षक ‘दत्त’ असेल, असे म्हटले गेले होते. पण आता एक ताजी खबर आहे. होय, संजय दत्तच्या या बायोपिकचे नाव ‘दत्त’ नाही तर ‘संजू’ असणार आहे. संजय दत्तला लोक प्रेमाने संजू म्हणतात. त्यामुळे त्याच्या बायोपिकलाही हेच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. अर्थात अद्याप याबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही.चित्रपटासाठी रणबीर कपूरने आपले लूक पूर्णपणे बदलले आहे आणि तो जवळपास संजय दत्त सारखा दिसू लागला आहे. चित्रपटाचे शूटींग अंतिम टप्प्यात आहे. आता केवळ एका गाण्याचे शूटींग तेवढे बाकी आहे. अलीकडे या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल विचारल्यावर रणबीर कमालीचा उत्सूक दिसला. ‘मी या चित्रपटासाठी फिंगर क्रॉस्ड करून ठेवले आहेत. शूटींगचा अनुभव विलक्षण होता. संजय दत्तने आपल्या आयुष्यात काय काय सहन केले, ही कल्पनाही मी करू शकत नाही. त्याने चूक केली, त्यासाठी मोठी शिक्षा भोगली आणि यासोबतचं आयुष्यात हवे ते सगळे मिळवले. त्याचा जीवनपट अद्भूत आहे आणि मी त्याच्या भूमिकेत शिरण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. लोकांना माझे हे प्रयत्न आवडतील, अशी मी अपेक्षा करतो,’ असे रणबीर म्हणाला होता.ALSO READ : माझ्या मुलाने माझ्यासारखे बनू नये, हीच प्रार्थना करतो : संजय दत्तया चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते परेश रावल हे संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री मनीषा कोईराला संजयची आई नरगिस दत्त यांची व्यक्तिरेखा जिवंत करणार आहे. येत्या ३० मार्चला रिलीज होणा-या या चित्रपटाची पे्रक्षक आतुरतेने प्रतीक्षा करताहेत. तोपर्यंत या चित्रपटाचे ‘संजू’ हे टायटल कसे वाटते, ते आम्हाला कळवायला विसरू नका.