Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशा खास अंदाजात पत्नी मान्यताने दिल्या संजय दत्तला शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:16 IST

बॉलिवूडचा संजय दत्त आज 58वा वर्षांचा झाला आहे. त्याचा हा वाढदिवस स्पेशल बवनण्यासाठी पत्नी मान्यता दत्त हीने सोशल मीडियावर ...

बॉलिवूडचा संजय दत्त आज 58वा वर्षांचा झाला आहे. त्याचा हा वाढदिवस स्पेशल बवनण्यासाठी पत्नी मान्यता दत्त हीने सोशल मीडियावर फोटो टाकून पोस्ट शेअर केली आहे. यासोबतचा तिने एक सुंदर मेसेज सुद्धा लिहिला आहे. ''तुम्‍हारे साथ होने से ही मेरे सारे बंधन टूट जाते हैं.'' तुला वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा. या फोटो मान्यता ब्लॅक रंगाचा ड्रेस आणि त्यांना ब्लॅक रंगाचा शर्ट परिधान केला आहे.  तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटासोबत लिहिले आहे.आयुष्य पडून पुन्हा उभ राहण्यासाठी असते.    सध्या संजय दत्त त्याचा आगामी चित्रपट भूमीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. संजय दत्तचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायेत. त्याच्या वाढदिवसाच्या औचित्यसाधत या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये संजयचा चेहरा खूपच भयानक दिसतो आहे. संजूबाबाच्या वाढदिवशी भूमीचे ट्रेलर रिलीज करण्यात येणार होते. मात्र संजय दत्तने चित्रपटाचा ट्रेलर मुलगी त्रिशाला च्या वाढदिवशी रिलीज करण्यास सांगितले. संजय दत्तला आपल्या मुलीचा वाढदिवस खूपच स्पेशल बनवायचा आहे. भूमी हा चित्रपटातून बाप-लेकीच्या नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. संजय दत्त आपल्या दोन्ही मुली त्रिशाला आणि इकाराच्या खूप जवळ आहे.